उस्मानाबाद :राज्यातील भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. उस्मानाबादमधील तुळजापूरच्या भवानीमातेचं दर्शन घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गोंधळ घातला. गोंधळातून भाजप सरकारचा निषेध केला.


या आंदोलनात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, आमदार अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार होते.

विनाअट आणि सरसकट शेतकरी कर्जमाफी, दूध आणि शेतीमालासाठी हमीभाव, विषारी औषध फवारणीमुळे बळी गेलेल्या शेतकरी कुटुंबियांना मदत, आरक्षण इत्यादी मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत.

हल्लाबोल आंदोलनात सुप्रिया सुळेंचा आदिवासी नृत्यावर ठेका

मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्याच्या 27 तालुक्यांमध्ये 1800 किलोमीटरचा टप्पा दहा दिवसांमध्ये पार करण्यात येणार आहे. या दहा दिवसांच्या आंदोलनात साधारण 27 सभांचं आयोजन करण्यात आल्या आहेत.

हल्लाबोल आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी दुपारी चार वाजता उमरगा इथे जाहीर सभा घेण्यात येणार आहे. 31 जानेवारीला या आंदोलनाचा समारोप होईल. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

याआधी राष्ट्रवादीने 1 ते 12 डिसेंबर या काळात पहिलं हल्लाबोल आंदोलन केलं होतं.