९ जानेवारीला करियाला मुंबईत अटक झाली होती. त्यानंतर भोईवाडा कोर्टानं त्याला १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. ज्याला करियानं सोमवारी हायकोर्टात आव्हान दिलं होतं.
कमला मिल खटल्यातील आरोपी विशाल करियाला दिलासा देत मुंबई उच्च न्यायालयानं त्याला रितसर जामीन अर्ज करण्याची परवानगी दिली. केवळ अभिजीत मानकरची गाडी स्वत:जवळ ठेवली म्हणजे आपला या अग्निकांडाशी थेट संबंध आहे असा मुंबई पोलिसांचा आरोप चुकीचा आहे. असा दावा करत विशाल करियानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांनी सरकारी वकिलांना विचारणा केली की, तुमच्याकडे करिया विरोधात आणखी सबळ पुरावे आहेत का? जेणेकरून तुम्ही त्याच्यावर आणखी कलम लावू शकता? यावर सरकारी वकिलांनी नकारार्थी उत्तर दिलं. करियावर आणखीन गंभीर कलम लावण्यासाठी पुरावे नसल्याची सरकारी वकिलांनी कबुली दिल्यानं हायकोर्टानं करियाची याचिका स्वीकारत त्याला खालच्या कोर्टात रितसर जामीन अर्ज करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तातडीनं करियाच्यावतीनं भोईवाडा कोर्टात जामीनासाठी दाखल केलेला अर्ज मान्य करण्यात आला.
संबंधित बातम्या :