एक्स्प्लोर

कमला मिल्सचा मालक-संचालक रमेश गोवानीला अटक

या गुन्ह्यातील सहभाग उघड झाल्यानंतर ना म जोशी मार्ग पोलिसांनी गोवानीना सोमवारी रात्री बेड्या ठोकल्या.

मुंबई : कमला मिल्स कम्पाऊंडचा मालक आणि संचालक रमेश गोवानीला चेंबूरमधून अटक करण्यात आली आहे. कमला मिल्स कम्पाऊंडमधील अग्नितांडवाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. रमेश गोवानीला आज भोईवाडा कोर्टात हजर केलं जाईल. कमला मिल्स कम्पाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो या रेस्टोपबला लागलेल्या भीषण आगीप्रकरणी मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील सहभाग उघड झाल्यानंतर ना म जोशी मार्ग पोलिसांनी गोवानीना सोमवारी रात्री बेड्या ठोकल्या. वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो या रेस्टोपबला 28 डिसेंबरच्या मध्यरात्री भीषण आग लागून 14 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी वन अबव्हचे मालक कृपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्यासह मोजोस बिस्त्रोचे मालक युग पाठक आणि युग थुली यांना अटक केली होती. तसंच आरोपींना आश्रय देऊन पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी विशाल कारियालाही बेड्या ठोकल्या. याशिवाय कमला मिल्सचा भागीदार रवी भंडारी, अग्निशमन दलाचे अधिकारी राजेंद्र पाटील आणि दोन्ही रेस्टोपबला हुक्का पुरवणार्‍या उत्कर्ष पांडेला अटक केली होती. वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो या दोन्ही रेस्टोपबमध्ये अवैधरीच्या हुक्का पार्लर चालवण्यासोबत, अवैधरीत्या केलेल्या बांधकामाची माहिती रमेश गोवानीला होती. तरीही त्याने याकडे दुर्लक्ष केला. आरोपींच्या चौकशीतून गोवानीचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाला आणि चौकशीअंती सोमवारी रात्री त्याला अटक करण्यात आलं. कमला मिल आगीप्रकरणी कोणाकोणाला अटक?
  1. कृपेश संघवी (हॉटेल वन अबव्ह) (10 जानेवारी रात्री)
  2. जिगर संघवी (हॉटेल वन अबव्ह) (10 जानेवारी रात्री)
  3. अभिजीत मानकर (हॉटेल वन अबव्ह) (11 जानेवारी सकाळी)
  4. विशाल कारिया (आरोपींना आश्रय दिल्याचा आरोप) (9 जानेवारी सकाळी)
  5. युग पाठक (मोजोस बिस्त्रोचा दुसरा मालक)
  6. युग तुली (मोजोस बिस्त्रोचा मालक) (15 जानेवारी रात्री)
  7.  केविन केणी बावा (मॅनेजर, 'वन अबव्ह') - (1 जानेवारी )
  8. लिसबन स्टेनील लोपेज (मॅनेजर, 'वन अबव्ह') (1 जानेवारी )
  9. रवी भंडारी (कमला मिल्सचा भागीदार) (20 जानेवारी)
  10. राजेंद्र पाटील अग्निशमन दलाचे अधिकारी (20 जानेवारी)
  11. उत्कर्ष पांडे (मोजोस बिस्त्रो, वन अबव्हला हुक्का पुरवणारा) (20 जानेवारी)
कमला मिल्स कम्पाऊंड आग प्रकरण मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. गुरुवार 28 डिसेंबरच्या रात्री 12.30 च्या सुमारास मोजोस पबला भीषण आग लागली होती. यावेळी येथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. संबंधित बातम्या : कमला मिल आग: शरण आलेल्या युग तुलीला बेड्या कमला मिल्स आग : 'वन अबव्ह' पबच्या तिन्ही मालकांना अटक विशाल कारिया, बाळा खोपडे कमला मिल अग्नितांडवाचे मास्टरमाइंड? कमला मिल अग्नितांडवप्रकरणी आणखी एकाला अटक कमला मिल अग्नितांडव : मोजोसच्या मालकाविरोधात अखेर गुन्हा दाखल 'मोजोस बिस्ट्रो मधल्या शेगडीमुळेच कमला मिल्स कंपाऊंडमध्ये अग्नितांडव' कमला मिल घटनेदिवशी माझ्यावर नेत्यांकडून दबाव : बीएमसी आयुक्त कमला मिल्स आगीतून जखमींना वाचवणाऱ्या सुदर्शन शिंदेंचा सत्कार कमला मिल आग : '1 अबव्ह' हॉटेलच्या दोन मॅनेजरना अटक कमला मिल आग : '1 अबव्ह'च्या मालकांच्या काकाविरोधात गुन्हा मुंबईतील अग्नितांडवाला ठाकरे कुटंबीय जबाबदार : नितेश राणे अपघात नव्हे हत्या, कमला मिलच्या आगीत 14 निष्पापांचा मृत्यू कमला मिल आग : तीन आरोपींविरोधात लूकआऊट नोटीस बीएमसीची मोजोस् बिस्त्रो आणि 1 Above विरोधात तक्रार अग्नितांडवानंतर अनधिकृत बांधकामांवर हातोडा, बीएमसीची कारवाई 1Aboveचं अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश, मात्र कारवाई नाहीच : खान हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, अधिकाऱ्यांवरही करु: मुख्यमंत्री कमला मिल आग: 5 अधिकारी निलंबित भेंडीबाजारातील त्या इमारतीचं काय? : विखे पाटील कमला मिल आग: टॉयलेटमधून फोन केला, भावोजी आम्हाला वाचवा! कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं! कमला मिल्स आग : सुमारे 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक' कमला मिल्स आग : मनसे नेत्याच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर... कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू मुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईलChhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget