एक्स्प्लोर

हॉस्पिटलने बिलासाठी अडवलं, कल्याणमध्ये नगरसेवकाने कोरोनामुक्त आजींना थेट उचलून आणलं!

कोरोनामुक्त रुग्णाला शिवसेना नगरसेवकाने हॉस्पिटलमधून उचलून आणल्याचा प्रकार कल्याणमधील श्रीदेवी रुग्णालयात घडला आहे. बिलासाठी अडवणूक केल्याने नगरसेवक महेश गायकवाड आक्रमक झाले.

कल्याण : कोरोनावर मात केलेल्या एका आजीबाईंना हॉस्पिटलने बिलासाठी थांबवून ठेवल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला. यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकाने थेट पीपीई किट घालत हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला आणि या आजीबाईंना उचलून बाहेर आणलं.

कल्याण पूर्वेत राहणाऱ्या या आजीबाईंना कोविड-19 झाल्याने त्या 14 दिवसांपूर्वी कल्याणच्या श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. दाखल होताना त्यांना 70 ते 80 हजार रुपये बिल होईल, असं सांगण्यात आलं, त्यानुसार त्यांनी 80 हजार रुपये भरलेही. मात्र डिस्चार्ज देताना त्यांना पीपीई किटचे 49 हजार आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे अतिरिक्त पैसे असे वाढीव 70 ते 80 हजार रुपये मागण्यात आले. हे पैसे दिल्याशिवाय डिस्चार्ज देता येणार नसल्याचं सांगत त्यांची अडवणूक करण्यात आली.

ही बाब त्यांच्या कुटुंबीयांनी शिवसेनेचे कल्याण पूर्वेतील नगरसेवक महेश गायकवाड यांना सांगताच महेश गायकवाड यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथल्या प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र हॉस्पिटलने आपल्याशी हुज्जत घातल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. त्यानंतर संतापलेल्या गायकवाड यांनी थेट पीपीई किट अंगावर चढवला आणि चौथ्या मजल्यावर दाखल असलेल्या या आजीबाईंना थेट उचलून हॉस्पिटलबाहेर आणलं. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवसेनेची आक्रमक भूमिका आणि पोलिसांच्या मध्यस्थीमुळे अखेर हॉस्पिटल प्रशासन नरमलं. मात्र तरी देखील 40 हजार रुपये आकारण्यात आल्याचा आरोप नगरसेवक महेश गायकवाड यांनी केला.

महेश गायकवाड हे कल्याणमधले शिवसेनेचे आक्रमक नगरसेवक म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी मनसेच्या अविनाश जाधव यांच्या अटकेनंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं. त्यांना आक्रमक भाषेत उत्तर देणारा गायकवाड यांचा व्हिडीओही बराच गाजला होता.

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Samadhan Sarvankar On Shivsena UBT Vishakha Raut: व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
BMC Fellowship Programme: 61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, BMC फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद
61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; अवघ्या 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, महापालिका फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Embed widget