कल्याण: दैनंदिन जीवनात तयार होणारा कचरा सर्वांनाच नकोसा असतो, म्हणूनच हा कचरा फेकून दिला जातो. मात्र हा कचरा योग्य प्रकारे गोळा केला तर तो धनकचरा ठरु शकतो. हीच किमया कल्याणच्या  कचरा वेचक महिला रेखा लाखे यांनी साधली आहे. त्यांनी कचरा वेचण्याच्या कामातून पैसा कमावून कचरा गोळा करण्यासाठी चक्क बोलोरे पिकअप गाडी घेतली आहे. या महिलेला कल्याण डोंबिवली महापालिकेने प्रोत्साहन आणि सहकार्य केल्याने तिच्यासह अन्य कचरा वेचकांच्या हाताला काम मिळाल्याचे तिने सांगितले.


कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्रांऊंडवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यातून प्लास्टिक भंगार वेचून ते विकून आलेल्या पैशातून याच डम्पिंग शेजारी असलेल्या साठे नगर वस्तीतील नागरिक आपला उदारनिर्वाह करत होते. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने मे 2020 पासून शहरात शून्य कचरा मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे .या मोहिमे कचरा कुंडी मुक्त शहर,ओला सुका कचरा वर्गीकरण अशा विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. 


वर्षभरापूर्वी केडीएमसीने आधारवाडी डंपिंगवर कचरा टाकने बंद केले होते. त्यामुळे त्या ठिकाणी कचरा वेचणाऱ्या शेकडो कचरा वेचकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. या कचरा वेचकाना पर्याय म्हणून  महापालिकेने त्यापैकी काही कचरा वेचकांना  क आणि ब प्रभाग क्षेत्रतील 50 सोसायट्यांमधून सूका कचरा गोळा करण्याची परवानगी दिली. सोसायट्यामधून सूका कचरा गोळा करत या कचरा वेचक महिला कर्मचाऱ्याचे वर्गीकरण करत कचऱ्याची विक्री करतात. तर विकण्यायोग्य नसलेला कचरा रिसायकलिंगसाठी पाठवला जातो.  गोळा केलेला कचरा विकून जमा झालेल्या पैशातून लाखे हिने कचरा गोळा करण्यासाठी लागणारी बोलेरो पिकअप व्हॅन खरेदी केली असून या गाडीचा वापर सूका कचरा गोळा करण्यासाठी केला जाणार आहे. तर गोळा केलेल्या प्रतिटन कचऱ्याच्या बदल्यात एक हजार रुपयांची रॉयल्टी महापालिकेस देणार आहेत.  


केवळ दोन प्रभागातील कचरा या महिला उचलून त्यातून त्यांनी इतर महिलांसाठी व्यवसायाची संधी उपलब्ध केली असून उर्वरित प्रभागामधून देखील या महिलांच्या माध्यमातून कचरा उचलनण्याची मोहीम राबविण्याचा मानस असून यामुळे सुक्या कचऱ्याची समस्या सुटण्याबरोबरच महापालिकेला कचऱ्यातून उत्पन्न मिळण्याचा आणि गरीब गरजू महिलाना रोजगार मिळण्याची संधी मिळणार असल्याचे उपायुक्त कोकरे यांनी सांगितले. स्वतःबरोबर महिलांसाठी आदर्श बनणाऱ्या रेखा यांचे महापालिकेने विशेष कौतुक केले आहे.


महत्त्वाच्या बातम्या :