Kalyan : कल्याण महात्मा फुले पोलिसांनी गेल्या आठवडाभरात चैन मोबाईल स्नेचिंग ,बाईक चोरी ,बॅग लिफ्टिंग अशा तब्बल 24 गुन्ह्यांची उकल करत सहा आरोपी चोरट्याना अटक केली. या आरोपीमध्ये दोन महिलाचा समावेश आहे.या चोरट्याकडून पोलिसांनी 20 तोळे सोने ,दोन मोबाईल फोन,9 दुचाक्या असा मिळून तब्बल 15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . 


कल्याण परिसरात चैन मोबाईल स्नेचिंग ,बाईक चोरी ,बॅग लिफ्टिंग च्या घटना वाढल्या होत्या .हे गुन्हे रोखण्यासाठी गुन्ह्यांना आळा घालन्यासाठी आरोपींना अटक करण्यासाठी कल्याण महात्मा पोलिसांच्या पथकाने जंग जंग पछाडले होते . मागील आठवडाभरात कल्याण महात्मा फुले पोलीसांच्या पथकाने तब्बल 23 गुन्हे उघडकीस आले आहे .बॅग लिफ्टिंग प्रकरणी आरती पाटील , शालिनी पवार या दोघींना अटक केलीं आहे त्यांच्याकडून 9 गुन्ह्यांची उकल करण्यात आली .मोबाईल स्नेचिंग प्रकरणी पाहिजे असलेला आरोपी मुस्तफा जाफर हा कल्याण चार्ट कल्याण नजीक असलेल्या आंबिवली येथील हिरोनी वस्तीत लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे कल्याण महात्मा पोलिसांनी या वस्तीत कोम्बिंग ऑपरेशन करताना मुस्तफा जाफर उर्फ इराणी याला बेड्या ठोकल्या असून त्याने 8 गुन्ह्याची कबुली केली. त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात चैन स्नेचिंग,दुचाकी चोरीचे 16 गुन्हे दाखल आहेत. 


कल्याण मधील विविध विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकीच्या गुन्ह्याचा तपास करत या गुन्ह्यांमध्ये  साजिद अन्सारी  ,आकाश यशवंते ,जॅक बिका यांना अटक केली आहे. गेल्या आठवडाभरात केलेल्या या कारवाईत कल्याण महात्मा फुले पोलीसानी 24 गुन्ह्याचा उलगडा करत 2 महिला आरोपी, 4 पुरुष आरोपी यांना अटक करून त्यांच्याकडून एकूण 200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने , 2 मोबाईल फोन , 9 मोटार सायकली व रोख रक्कम 15 लाख 38 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे उपआयुक्त सचिन गुंजाळ पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने , प्रदीप पाटील, दीपक सरोदे, सागर चव्हाण व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.