एक्स्प्लोर

kadaknath scam I कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत

राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. राज्यात महाआघाडीचे नवीन सरकार आल्यामुळे कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समिती सक्रिय झाली आहे.

मुंबई - कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. 13 डिसेंबरला कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीकडून विधानभवनावर हक्क आणि न्यायाच्या मागणीसाठी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. 9 डिसेंबरला बेळगावपासून बाईक रॅली काढत या मोर्चाला सुरुवात होणार आहे. तर, 10 तारखेला कोल्हापूर, 11 ला सातारा आणि त्यानंतर 12 डिसेबरला पुण्यात मोर्चा पोहोचणार असून 13 तारखेला विधानभवनावर हा मोर्चा येऊन धडकणार आहे. यात फसवणूक झालेले शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. महारयत अॅग्रो कंपनीने 6 ते 8 हजार शेतकऱ्यांना गंडा घातला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती महाराष्ट्रासह पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि कर्नाटकपर्यंत जाऊन पोहोचल्याचं तक्रारदारांकडून सांगण्यात येतंय. गेल्या सरकारने या प्रकरणाची कुठलीही दखल घेतली नाही. अनेक ठिकाणी या विरोधात तक्रार देणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारीही पोलिसांनी नोंदवून न घेतल्याचा आरोप या समितीकडून करण्यात येतोय. ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा असून या प्रकरणात ते आम्हाला नक्कीच न्याय मिळवून देतील असा त्यांना विश्वास आहे. काय आहे कडकनाथ कोंबडी घोटाळा? सांगली जिल्ह्यात कडकनाथ कुक्कुटपालन ही योजना सुरु करण्यात आली. पैसे गुंतवा, पक्षी पाळा, अंडी आणि कोंबड्या विका, असं या योजनेचं स्वरुप होतं. सुरुवातीला यात मालकास 75 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागते. पक्षांसाठी लागणारा खाद्यपुरवठा कंपनीकडूनच केला जात होता. यातून तयार होणारे पक्षी आणि अंडी हेसुद्धा कंपनी ठराविक दराने घेऊन जाणार होती. यातून शेतकर्‍याला एका वर्षात पावणे तीन लाख देण्याचं आमिष दाखवण्यात आलं. दरम्यान, गुंतवणुकीत रक्कम दुप्पट, तिप्पट करण्याच्या नावाखाली या कंपनीने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील हजारो शेतकर्‍यांची लूट या कंपनीने केली आहे. गुंतवणूकदारांना परतावा देऊ शकत नसल्याने राज्यातील अनेक कार्यालयांना टाळं ठोकून कंपनीचे संचालक फरार झाले आहेत. महाराष्ट्र बरोबरच कर्नाटक, तेलंगणा, केरळ, गोवा यासह हजारो शेतकऱ्यांना सुमारे 800 कोटींना महारयत अॅग्रो कंपनीने गंडा घातल्याची शक्यता आहे. याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी संस्थापक सुधीर मोहितेसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. यातील तिघांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य सुत्रधार सुधीर फरार होता. अटकपूर्व जामिनासाठी त्याने न्यायालयात अर्जही केला होता. या अर्जावर सुनावणी होण्याआधीच आज तो न्यायालयात शरण आला. संबंधित बातम्या : कडकनाथ कोंबडी घोटाळा, मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद कोहलीने कडकनाथ खावा, कृषी विज्ञान केंद्राचा सल्ला VIDEO | सांगलीतील कडकनाथ कोंबडी घोटाळ्याप्रकरणी आरोपी गणेश शेवाळेला अटक | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
Embed widget