एक्स्प्लोर

हवेची दिशा सांगता येते, राजकारणाची नाही, 'मातोश्री' भेटीनंतर आव्हाडांचं उत्तर

राष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वी आव्हाडांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट वैयक्तिक होती, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे. दोन माणसांच्या विचारधारा वेगवेगळ्या असल्या म्हणून ते भेटू शकत नाही का? असा सवाल आव्हाडांनी केला. राष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वी आव्हाडांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 2014 ला समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न सुरु होता, 2019 ला काही वेगळी समीकरणं जुळतील का? असा प्रश्न आव्हाडांना विचारला असता 'हवेची दिशा सांगता येते पण राजकारणाची सांगता येणार नाही, मी ज्योतिषी नाही' असं सूचक वक्तव्य आव्हाडांनी केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप घेऊन गेला होतात का? असा सवाल जितेंद्र आव्हाडांना करण्यात आला. 'मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. त्यांचा निरोप मी काय घेऊन जाणार? माझं वैयक्तिक काम होतं, म्हणून मी गेलो होतो' असं उत्तर आव्हाडांनी दिलं. 'मातोश्री'वर दोघांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा रंगली. जितेंद्र आव्हाड हे विरोधी पक्ष अर्थात राष्ट्रवादीचे आक्रमक नेते आहेत. त्यांनी सातत्याने शिवसेना-भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. विशेषत: शिवसेनेच्या भूमिकेवर ते नेहमीच सडकून टीका करतात. शिवाय सामनातूनही आव्हाडांवर बोचरे वार केले जातात.  मात्र तेच जितेंद्र आव्हाड आज ‘मातोश्री’वर गेल्याने चर्चांना उधाण आलं आहे. आघाडीत मनसेला सामावून घेण्याचा विचार सुरु असून या भेटीनंतर वेगळं काही पाहायला मिळू शकतं? असं आव्हाडांना विचारण्यात आलं. 'फॅसिझम जावा, हा आम्हा सर्वांचा हेतू आहे. सामनामधून वेळोवेळी इशारे दिले जात आहेत, पण गटबंधन किंवा महाआघाडी हे माझ्या अवाक्याबाहेर आहे. पण माझी इच्छा आहे' असे संकेतही आव्हाडांनी दिले. उद्धव ठाकरेंशी अनेक विषयांवर चर्चा झाली, पण ते जाहीररित्या सांगणं योग्य नसल्याचंही आव्हाड म्हणाले. आव्हाडांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट पवारांना आवडेल का? असा प्रश्न विचारला असता 'हे माझं वैयक्तिक आयुष्य आहे. माझं पक्षावरचं आणि पवार साहेबांवरचं प्रेम इतकंही पातळ नाही.' असं आव्हाड म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक नियोजित आहे. मात्र त्या बैठकीला जाण्यापूर्वी आव्हाड हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहचले. जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्या जवळचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीच्या दृष्टीने काँग्रेसशी चर्चा सुरुच आहे. शिवाय भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याबाबतची भूमिका पवारांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Mumbai Voter List News: मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Embed widget