Isha Ambani : ईशा अंबानी जुळ्या बाळांसह आज भारतात येणार, स्वागताची जंगी तयारी; अंबानी कुटुंबीय तब्बल 300 किलो सोनं दान करणार
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कन्या ईशा अंबानी (Isha Ambani) आणि त्यांचे पती आनंद पिरामल (Anand Piramal) हे त्यांच्या जुळ्या बाळांसोबत आज पहिल्यांदाच अमेरिकेतून भारतात येणार आहेत.

Isha Ambani : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कन्या ईशा अंबानी (Isha Ambani) आणि त्यांचे पती आनंद पिरामल (Anand Piramal) हे त्यांच्या जुळ्या बाळांसोबत (Twin) आज पहिल्यांदाच अमेरिकेतून (America) भारतात येणार आहेत. त्यांचं जंगी स्वागत आज केलं जाणार आहे. स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी साडेआठ वाजता हे दोघेही व्हीआयपी गेट नंबर आठवर दाखल होणार आहे आहेत. विमानातून येताना अमेरिका आणि भारतातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीमही त्यांच्यासोबत असणार आहे. दरम्यान, याप्रसंगी अंबानी कुटुंबीय तब्बल 300 किलो सोनं दान करणार आहे.
पाच अनाथाश्रम सुरु केली जाणार
कतार एअरलाईन्सच्या स्पेशल विमानानं लॉस अँजलिसवरुन ईशा अंबानी आणि आनंद पिरामल हे मुंबईत येतील. विमानातून येताना अमेरिका आणि भारतातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीमही त्यांच्यासोबत असणार आहे. बाळांच्या स्वागतासाठी ईशा अंबानीच्या 'करुणा सिंधू' निवासस्थानावर देशभरातील एक हजार साधूसंत येणार आहेत. याप्रसंगी अंबानी कुटुंबीय तब्बल 300 किलो सोनं दान करणार आहेत. तसेच अंबानी आणि पिरामल कुटुंबाकडून पाच अनाथाश्रम सुरु केली जाणार आहेत. जगभरातील फेमस शेफ याप्रसंगी पंचपक्वान्न बनवणार आहेत. तसेच, तिरुपती, द्वारका येथूनही मिष्ठान्न आणण्यात येतील.
बाळांसाठी खास व्यवस्था
बाळांसाठी Hermes, Dior या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचं फर्निचर आणि नर्सरी 'करुणा सिंधू' आणि 'अँटेलिया'मध्ये तयार करण्यात आली आहे. बाळांसाठी dolce gabbana, Gucci, Loro piana या ब्रँडचे खास कपडे तयार करण्यात आले आहेत. बाळांसाठी चक्क बीएमडब्ल्यू कंपनीकडून कार सीट डिझाईन करण्यात आली आहे. बाळांची देखभाल करण्यासाठी अमेरिकेहून आठ स्पेशल ट्रेनिंग घेतलेल्या नॅनी येणार आहेत.
12 डिसेंबर 2018 ला ईशा अंबानी यांचा विवाह झाला होता
उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांचे 12 डिसेंबर 2018 रोजी पिरामल ग्रुपचे मालक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्याशी लग्न झाले होते. देशातल्या सर्वात महागडल्या विवाह सोहळ्यांपैकी हा एक होता. या विवाह सोहळ्यात प्रसिद्ध उद्योगपती आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या विवाह सोहळ्याची सर्वत्र जोरदार चर्चा झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
Isha Ambani House Pics: ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा बंगला पाहून तुम्ही व्हाल आश्चर्यचकित, डायमंड कट इंटीरियरपासून टेबलावरील चांदीच्या भांड्यापर्यंतचे पाहा फोटो
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
