एक्स्प्लोर

INS Vagsheer : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; आयएनएस वागशीरचे आज जलावतरण

INS Vagsheer : आयएनएस वागशीर या पाणबुडीचे आज जलावतरण पार पडणार आहे. या पाणबुडीची बांधणी माझगाव शिपबिल्डर्स लिमिटेडने केली आहे. .

INS Vagsheer : भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. भारतीय नौदलाच्या सेवेत आयएनएस वागशीर ही पाणबुडी दाखल होणार आहे. आज या पाणबुडीचे जलावतरण करण्यात येणार आहे. 'प्रोजेक्ट 75' च्या अंतर्गत स्कॉर्पिन वर्गाची ही सहावी पाणबुडी आहे. 

माझगाव डॉकने या पाणबुडीची बांधणी केली आहे. संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांच्या मुख्य उपस्थितीत पाणबुडीचे जलावतरण करण्यात येणार आहे. ' आयएनएन वागशीर' ही स्कॉर्पिन वर्गाची सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे. 

आज वागशीर पाणबुडीचे जलावतरण झाल्यानंतर एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी चाचणी आणि परीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर ही पाणबुडी युद्धासाठी पूर्णपणे तयार होणार आहे. ही पाणबुडी पूर्णपणे तयार झाल्यानंतर तिचा समावेश भारतीय नौदलात करण्यात येणार आहे. 

माझगाव शिपबिल्डर्स लिमिटेडने तयार केलेल्या वागशीर पाणडूबीत अत्याधुनिक तंत्रज्ञानसह स्टेल्थ टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ही पाणबुडी स्कॉर्पीन कलावरी वर्गातील डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी असून ती अत्याधुनिक नेव्हिगेशन आणि ट्रॅकिंग सिस्टमने सुसज्ज आहे. 

आतापर्यंत माझगाव डॉक लिमिटेडने तयार केलेल्या स्कॉर्पिन वर्गाच्या कलवरी, खंडेरी, करंज , वेला या पाणबुड्यांचा समावेश भारतीय नौदलात करण्यात आला आहे.  

आयएनएस वागशीर पाणबुडी ही डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी आहे. कमी आवाजात शत्रूची सहज दिशाभूल करण्याची क्षमता असलेल्या आयएनएस वागशीरमध्ये 18 टॉर्पेडो वाहून नेण्याची क्षमता आहे. या पाणबुडीतून एकाच वेळी सहा टॉर्पेडो डागता येतात. शिवाय जहाजविरोधी क्षेपणास्त्रे नष्ट करण्याची या पाणबुडीची खासियत आहे. ही पाणबुडी 50 दिवस पाण्यात राहू शकते. आयएनएस वागशीर या पाणबुडीचे अंतर्गत तंत्रज्ञान फ्रेंच आणि एका स्पॅनिश कंपनीने तयार केले आहे.  

पाहा: INS Vagsheer: आयएनएस वागशीर नौदलाच्या ताफ्यात येणार

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

शिवाजी महाराजांसोबत तुलना मोदींनाही आवडणार नाही, पण..; अमित ठाकरेंनी फोटो हटवला, एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
शिवाजी महाराजांसोबत तुलना मोदींनाही आवडणार नाही, पण..; अमित ठाकरेंनी फोटो हटवला, एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
MPSC चा भोंगळ कारभार सुरूच, मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये मोठी तफावत; 250 पैकी 2, 6 अन् 11 गुण, पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
MPSC चा भोंगळ कारभार सुरूच, मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये मोठी तफावत; 250 पैकी 2, 6 अन् 11 गुण, पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
Tukaram Mundhe: मोठी बातमी : तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला सरकारची स्थगिती, सुटे तेल विक्रीला 1 वर्षांची सूट!
Tukaram Mundhe: मोठी बातमी : तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला सरकारची स्थगिती, सुटे तेल विक्रीला 1 वर्षांची सूट!
BJP vs MNS in Mumbai: भाजयुमोचा राज ठाकरेंच्या घरावर धडकण्याचा प्लॅन, पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्कची वेसही ओलांडून दिली नाही
भाजयुमोचा राज ठाकरेंच्या घरावर धडकण्याचा प्लॅन, पण मनसैनिकांनी शिवाजी पार्कची वेसही ओलांडून दिली नाही

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी आमदार डुलक्या मारत होते, संजय राऊतांचा टोला
Laxman Hake OBC Morcha: पोलिसांनी पु्ण्यातील दौंडमध्ये लक्ष्मण हाकेंचा ओबीसी मोर्चा रोखला
Rahul Gandhi : राहुल गांधींवर आरोप काय? तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद | Special Report ABP Majha
Manoj Jarange : मनोज जरांगेंची आरपारची लढाई, पुन्हा चलो मुंबई | Special Report ABP Majha
Amit Thackeray on Modi : मोदींचा फोटो हटवला,  अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC चा भोंगळ कारभार सुरूच, मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये मोठी तफावत; 250 पैकी 2, 6 अन् 11 गुण, पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
MPSC चा भोंगळ कारभार सुरूच, मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये मोठी तफावत; 250 पैकी 2, 6 अन् 11 गुण, पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
मंत्री जयकुमार गोरेंचा ताफा अडवला, मराठा बांधवांची थेट गाडीखाली उडी; पालकमंत्र्यांची SP अंजना कृष्णांशी चर्चा
मंत्री जयकुमार गोरेंचा ताफा अडवला, मराठा बांधवांची थेट गाडीखाली उडी; पालकमंत्र्यांची SP अंजना कृष्णांशी चर्चा
शिवाजी महाराजांसोबत तुलना मोदींनाही आवडणार नाही, पण..; अमित ठाकरेंनी फोटो हटवला, एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
शिवाजी महाराजांसोबत तुलना मोदींनाही आवडणार नाही, पण..; अमित ठाकरेंनी फोटो हटवला, एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Mumbai BMC News : मुंबईत BMC अभियंत्यांच्या बदल्यांसाठी रेट कार्ड, भाजप आमदाराचा गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबईत BMC अभियंत्यांच्या बदल्यांसाठी रेट कार्ड, भाजप आमदाराचा गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?
मोठी बातमी! MPSC पेपरफुटीत गौरवनंतर प्रेयसी ऋतुजा पाटीललाही अटक; पोलिसांची नंदूरबारमधून कारवाई
मोठी बातमी! MPSC पेपरफुटीत गौरवनंतर प्रेयसी ऋतुजा पाटीललाही अटक; पोलिसांची नंदूरबारमधून कारवाई
Tukaram Mundhe: मोठी बातमी : तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला सरकारची स्थगिती, सुटे तेल विक्रीला 1 वर्षांची सूट!
Tukaram Mundhe: मोठी बातमी : तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला सरकारची स्थगिती, सुटे तेल विक्रीला 1 वर्षांची सूट!
मराठा बांधव बैलगाडी घेऊन आजच मुंबईकडे रवाना; जरांगे पाटलांच्या आंदोलनाची पुढील दिशा, गंगाधर काळकुटेंनी सांगितलं
मराठा बांधव बैलगाडी घेऊन आजच मुंबईकडे रवाना; जरांगे पाटलांच्या आंदोलनाची पुढील दिशा, गंगाधर काळकुटेंनी सांगितलं
Vikhroli kannamwar nagar murder: विक्रोळीत महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला, पतीने बोटावरुन बायकोला ओळखलं, शेजाऱ्यानेच संपवलं अन् म्हणाला...
विक्रोळीत महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला, पतीने बोटावरुन बायकोला ओळखलं, शेजाऱ्यानेच संपवलं अन् म्हणाला...
Embed widget