एक्स्प्लोर

चेंबूर ते वडाळा मोनोरेल दहा महिन्यांनी अखेर पुन्हा सुरु

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या आगीच्या घटनेपासून बंद असलेली मोनो पुन्हा एकदा सुरु झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई : गेले दहा महिने बंद असलेली मुंबईतील चेंबूर ते वडाळा ही मोनोरेल अखेर आज (शनिवार) पहाटे सहा वाजल्यापासून पुन्हा सुरू झाली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या आगीच्या घटनेपासून बंद असलेली मोनो पुन्हा एकदा सुरु झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी सकाळी सहा वाजता पहिली मोनोरेल वडाळा आणि चेंबूर या दोन्ही स्थानकांवरून सुटली. ही मोनो रात्री दहा वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे. दर पंधरा मिनिटांनी एक फेरी असेल. या टप्प्यावर मोनो दिवसभरामध्ये 130 फेऱ्या मारणार आहे. चेंबूर ते वडाळा ही देशातील पहिली मोनोरेल आहे. मोनोरेलचा दुसरा टप्पा 2 फेब्रुवारी 2019 पासून सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे एमएमआरडीएला यामुळे नुकसान सहन करावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा मोनो सुरु करण्यात आली असली तरी तिकीट दर मात्र वाढवण्यात आलेला आहे. प्रतिट्रीप 10,600 रुपयांचा दर प्रतीट्रिपच्या खर्चावरुन आपल्या आणि लार्सन ऍण्ड टुब्रो आणि मलेशियाची स्कोमी इंजिनिअरिंग (एलटीएसई) या कंपनीतील कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएने 15 ऑगस्ट रोजी जैन समितीची नियुक्ती केली होती. एलटीएसईने मोनोरेल्वे चालवण्यासाठी एका ट्रिपमागे 18 हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु जैन समितीने 10,600 रुपयांचा दर ठरवला. त्यानंतर एमएमआरडीएने ट्रिपमागे 10, 600 रुपये देण्याचं मान्य केलं आहे. दरम्यान, फेब्रुवारी 2019 पर्यंत मोनोरेलचा दुसरा टप्पा सुरु झाला की हा दर आणखी वाढवून देण्यात येणार आहे. नोव्हेंबर 2017 पासून सेवा बंद, कोट्यवधींचा तोटा नोव्हेंबर, 2017 मध्ये म्हैसूर कॉलनी स्थानकाजवळ मोनो रेलच्या डब्ब्यांना आग लागली होती. यात मोनोरेलचे दोन डब्बे जळून खाक झाले होते. तेव्हापासून मोनोरेलची सेवा ठप्प आहे. मोनोरेलच्या पहिल्या टप्प्यात दररोज 18 हजार ते 20 हजार लोक प्रवास करत होते. मोनोरेलची सेवा बंद झाल्याने एमएमआरडीएला दर महिन्याला 1 कोटी 80 लाख रुपयांचा तोटा होत आहे. फेब्रुवारी 2019 पासून दुसरा टप्पा एमएमआरडीए आयुक्त आर.ए.राजीव यांच्या माहितीनुसार, "पहिला टप्पा आम्ही एक सप्टेंबरपासून सुरु करत आहोत. दुसऱ्या टप्प्यासाठी रेकची फिटनेस टेस्ट डिसेंबरपर्यंत पूर्ण केलं जाईल. यानंतर जानेवारी अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करुन 2 फेब्रुवारी, 2019 पासून मोनोरेलचा दुसरा टप्पा वडाळा ते जेकब सर्कल दरम्यान सुरु केला जाईल."

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
Embed widget