Yashwant Jadhav Income Tax Raids Report : शिवसेनेचे नेते आणि मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी कोट्यवधींची उलाढाल केली असल्याचे आयकर विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आयकर विभागाने जाधव यांच्या घरावर छापा मारला होता. या छाप्याचा अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे. त्यात आयकर विभागाने कोट्यवधींच्या उलाढालीचा उलगडा केला आहे. 


कसा झाला घोटाळा? 


शेल कंपनींच्या माध्यमातून कोट्यावधींची उलाढाल करत कॅश पैसा या कंपनींना देण्यात आले आणि या कंपनीच्या माध्यमातून लिगल एन्ट्री स्वःताच्या आणि आपल्या निकटवर्तीयांच्या नावावर घेण्यात आल्या, लोनच्या स्वरुपात परिवारातील इतर सदस्यांना पैसे या शेल कंपनीकडून देण्यात आले. एकूण 15 कोटी रुपये यशवंत जाधव यांनी प्रधान डिलर्स यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यांमधून कर्ज म्हणून घेतले. आयकर विभागाच्या अहवालानुसार, उदय शंकर महावर या व्यक्तीकडून 2019-20 मध्ये यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि इतर सदस्यांना 15 कोटी दिले गेले. ही 15 कोटींची रोख रक्कम यशवंत जाधव यांनी उदय शंकर महावर यांना दिले आणि नंतर उदय शंकर यांच्या कंपनीकडून आपल्या खात्यांमध्ये लीगल एंट्री करुन घेतले. यातील 15 कोटी पैकी 1 कोटी यामिनी जाधव यांनी कर्ज घेतलं आणि ते निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं.


आयकर विभागाच्या अहवालात आणखी काय?


प्रधान डिलर्स यांच्या दोन कंपन्या स्कायलिंक कमर्शियल लिमिटेड आणि सुपरसॉफ्ट सप्लायर्स लिमिटेड यांच्या माध्यमातून पैसे 'व्हाईट' करण्यात आले असल्याचे आयकर विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आयकर विभागाने चंद्रशेखर राणे, क्रिष्णा भनवारीलाल तोडी आणि धीरज चौधरी यांचा जबाब नोंदवला. या संचालकांनी माहिती दिली की दोन्ही कंपनी शेल कंपनी आहे (फक्त कागदावर असलेली कंपनी याचा वापर काळा पैश्यासाठी केला जातो.)


या कंपनीचे नियंत्रण उदय शंकर महावरकडे आहे. हा कोलकत्तात एन्ट्री आॅपरेटर आहे. हा काळा पैसा घेऊन पांढरा पैसा करतो. उदय शंकर महावरचं जबाबदेखील घेण्यात आला आहे. चंद्रशेखर राणे आणि  प्रधान डिलर्स कंपनीतील माजी संचालक पियुष जैन यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. या दोघांनीही  डमी संचालक असल्याची कबुली दिली असून या शेल कंपनींचे नियंत्रण उदय शंकर महावरकडे असल्याचे सांगितले. उदय शंकर महावर याने प्रधान डिलर्स कंपनीज आणि सुपरसॉफ्ट सप्लायर्स ह्या कंपनी यशवंत आणि यामिनी जाधव यांच्या निकटवर्तीय यांच्या नावावर 2018-19 मध्ये हस्तांतरीत केल्यात. सन 2019-20 मध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली. त्यावेळेस 15 कोटी रुपये यशवंत जाधव यांना देण्यात आले. ही रक्कम रोख स्वरुपात देण्यात आली. 


उदय शंकर महावर यानं यशवंत जाधव यांच्या कुटुंबीयांसाठी अशा असंख्य एन्ट्रीज केल्याचा संशय आयकर विभागाला आहे. या सोबतच इतर शेल कंपनीकडून अशाच प्रकारे कोट्यवधींचा व्यवहार केला गेला आहे का, याचाही तपास आयकर विभाग करत आहे.


पाहा: Yashwant Jadhav यांच्याकडून 36 मालमत्ता खरेदी ? मुंबई महापालिकेला हादरा देणारी बातमी : ABP Majha


 



इतर महत्त्वाच्या बातम्या: