Mega Block on Harbour Line: मुंबई लोकलनं (Mumbai Local Trains) प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेनं उद्या (रविवारी 20 मार्च) हार्बर मार्गावर मेगा ब्लॉग (Sunday Mega Block) घोषित केलाय. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक ते चुनाभट्टी/ वांद्रे स्थानकापर्यंत (CSMT To Bandra/ Chunabhatti Railway Station) आणि चुनाभट्टी/ वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकादरम्यान (Bandra/ Chunabhatti Railway Station to CSMT) मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेनं ट्विटरच्या माध्यमातून मेगा ब्लॉकबाबत माहिती दिलीय.
मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, उद्या (रविवारी, 20 मार्च) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/ वांद्रे स्थानकावर सकाळी 11. 40 मि. पासून ते सायंकाळी 4.40 पर्यंत मेगा ब्लॉक असेल. तर, चुनाभट्टी/ वांद्रे स्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं धावणारी रेल्वे सेवा सकाळी 11.10 मि. ते 4.10 मि.वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. महत्वाचं म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज ते कल्याण मध्य लाईन मेगा ब्लॉग नसणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रशासनाकडून दिलगीर व्यक्त करण्यात आली आहे. उद्या असणाऱ्या मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था करण्याचं आवाहन करण्यात आलंय. रेल्वे प्रशासनाकडून विविध देखभालीची काम करण्यासाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो.
हे देखील वाचा-
- Mumbai Corona Update : मुंबईतील रुग्णसंख्येत मोठी घट, केवळ 29 नवे रुग्ण
- Sewri Nhava Sheva Trans Harbour Link प्रकल्पग्रस्त राज ठाकरेंच्या भेटीला; घरं, दुकानं बाधित होत असल्याचा आरोप
- Mumbai Corona Update : मुंबईत शुक्रवारी 48 कोरोनाबाधितांची नोंद, एकही मृत्यू नाही
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha