एक्स्प्लोर

शिक्षकांना वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणासंदर्भात महत्वाची बातमी; शिक्षक भारतीच्या मागणीला यश

तांत्रिक अडचणींमुळे ज्यांनी उशिरा प्रशिक्षण सुरू केले आहे त्यांना प्रशिक्षण सुरु झाल्यापासून 45 दिवसांपर्यंत मुदतवाढ दिली आहे

Mumbai News : 31 जुलैपर्यंत वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करता येणार असल्याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदचे संचालक यांनी जाहीर केले. यानुसार 52,551 प्रशिक्षणार्थी यांनी आतापर्यंत प्रशिक्षण पूर्ण केले असून उर्वरित सर्वांनी 31 जुलैपर्यंत वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करता येणार असल्याच्या स्पष्ट सूचना करण्यात आलेल्या आहेत. 23 आणि 24 जुलै रोजी ऑनलाईन प्रशिक्षण प्रणाली बंद राहणार आहे तसेच तांत्रिक अडचणींमुळे ज्यांनी उशिरा प्रशिक्षण सुरू केले आहे त्यांना प्रशिक्षण सुरु झाल्यापासून 45 दिवसांपर्यंत मुदतवाढ दिली आहे, असंही परिपत्रकात नमूद केले आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.  

वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाचे स्वाध्याय जमा करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून मिळावी आणि प्रशिक्षणार्थींना दिलासा द्यावा याबाबत आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या वतीने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदचे संचालक यांना पत्र पाठवण्यात आले होते. 

वरिष्ठ श्रेणी आणि निवडश्रेणी प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात प्रशिक्षणार्थींना दिलेल्या मोड्युल (प्रकरणे) ची संख्या जास्त आहे. व्हिडिओंची संख्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी लागणारा वेळ खूप जास्त आहे. PDF चे वाचन, व्हिडिओचे निरीक्षण करून स्वाध्याय हस्ताक्षरात लिहिणे व लिहिलेल्या स्वाध्यायांचे PDF अपलोड करणे यासाठी 15 जुलै 2022 पर्यंतचा दिलेला कालावधी खूप कमी पडत आहे. शिक्षकांना शालेय कामकाज करून प्रशिक्षणाचे दररोज चार ते पाच तास कामकाज करणे यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. 

दि. 01 जून 2022 पासून राज्यात इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड APP च्या माध्यमातून वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे सेवांतर्गत प्रशिक्षण सुरू आहे. 15 जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. राज्यात सेतू अभ्यासक्रम आणि जूलै महिन्यातील स्कॉलरशिप परीक्षेची तयारी सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे स्वाध्याय जमा करण्यासाठी मुदतवाढ मिळाल्यामुळे प्रशिक्षणार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget