एक्स्प्लोर
शिवसेनेच्या नेतेपदी कोणाची नेमणूक होणार?
या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे कायम राहतील शिवाय पक्षांतर्गत फेरबदल होणार हे निश्चित झाल्याचं समजतं आहे.
मुंबई : आज (सोमवार) ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे कायम राहतील शिवाय पक्षांतर्गत फेरबदल होणार हे निश्चित झाल्याचं समजतं आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यापैकी शिवसेनेच्या नेतेपदी कोण येईल हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. तर मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांची नेतेपदावरुन सल्लागार पदी नेमणूक होण्याची शक्यता आहे.
या बैठकीला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, सुभाष देसाई, दिवाकर रावते, संजय राऊत, अनिल परब, रामदास कदम, गजानन कीर्तिकर आणि अन्य नेते उपस्थित होते. उद्या शिवसेनेच्या कार्यकारणीची निवडणूक आहे. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख ते सचिव पदापर्यंतच्या निवडणुका होणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement