एक्स्प्लोर

भिडेंना अटक होत नसेल तर मुख्यमंत्र्यांना अटक करा : कोकाटे

संभाजी भिडेंना अटक न करण्याच्या षडयंत्रामागे मुख्यमंत्र्यांचा हात असल्याच्या संशयाला वाव आहे, असं कोकाटे म्हणाले.

मुंबई : संभाजी भिडे यांना अटक होत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटक करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे. कोरेगाव- भिमा हिंसाचाराचा आरोप असलेल्या संभाजी भिडे यांना अटक करा, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत आज एल्गार रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला संभाजी ब्रिगेडने समर्थन दिलं आहे. एल्गार रॅलीत सहभागी झालेले श्रीमंत कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संभाजी भिडेंना अटक न करण्याच्या षडयंत्रामागे मुख्यमंत्र्यांचा हात असल्याच्या संशयाला वाव आहे, असं कोकाटे म्हणाले. त्यामुळे संभाजी भिडेंना अटक होत नसेल, तर मुख्यमंत्र्यांना अटक केली पाहिले, अशी मागणी श्रीमंत कोकाटेंनी केली आहे. एल्गार रॅलीला पोलिसांची परवानगी नाही! प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात काढलेल्या या रॅलीला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. परीक्षा सुरु असल्याने रॅली काढू नका, वाहतुकीला अडथळा करु नका, असं आवाहन पोलिसांनी प्रकाश आंबेडकरांना केलं होतं. पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी दिली. मात्र रॅली काढण्यास परवानगी दिलेली नव्हती. मात्र तरीही प्रकाश आंबेडकरांनी रॅली काढली. दोन महिन्यांपासून मोर्चाची सूचना देऊनही सरकार भिडेंना पाठीशी घालतंय. शिवाय आंबेडकरी जनतेला दडपण्यासाठी पोलिसांच्या बळाचा वापर केला जात आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय रॅलीला परवानगी नाकारुन सरकार लोकशाहीचा गळा दाबत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मोर्चासाठी जनता महाराष्ट्रातून निघाली आहे. त्यांना आता रोखणं कठीण आहे. त्यामुळे आज आम्ही सीएसएमटीला जमणार आणि तिथं काय तो निर्णय होईल, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तर मिलिंद एकबोटे यांच्या अटकेनंतर संभाजी भिंडेंना अटक होईल अशी अपेक्षा होती, मात्र, ती फोल ठरल्याचंही आंबेडकर म्हणाले. संबंधित बातम्या LIVE : एल्गार मोर्चा : मुख्यमंत्र्यांचं प्रकाश आंबेडकरांना चर्चेचं निमंत्रण सरकारने लोकशाहीचा गळा दाबला : प्रकाश आंबेडकर

महत्त्वाच्या बातम्या

BMC Fellowship Programme: 61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, BMC फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद
61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; अवघ्या 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, महापालिका फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
Aus vs Ban 2nd Test Mitchell Starc : मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
Ind vs Sl 2nd Test : पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Embed widget