एक्स्प्लोर
मी नाराज असल्याचं वृत्त चुकीचं : पंकजा मुंडे
सदस्य नसतानाही मराठा आरक्षणाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे गेल्या. बैठकीत काही मुद्दे मांडून त्या नाराज होऊन बाहेरही आल्या.
मुंबई : "मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतून नाराज होऊन बाहेर पडल्याचं वृत्त चुकीचं आहे. सदस्यच नसल्याने मी बैठकीला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असं स्पष्टीकरण राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आहे.
सदस्य नसतानाही मराठा आरक्षणाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे गेल्या. बैठकीत काही मुद्दे मांडून त्या नाराज होऊन बाहेरही आल्या. यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असं वृत्त आलं होतं. मात्र हे वृत्त चुकीचं असून अशा बातम्या पसरवू नका, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
त्या म्हणाल्या की, "मी नाराज असल्याची बातमी चुकीची आहे. मराठा समाजाच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये मी नाही. मराठा आरक्षणाचं आंदोलन झालं त्यावेळी मी पुढे होते. चुकीची बातमी दाखवू नये ही विनंती. मी त्या बैठकीत गेले नव्हते. बैठक ज्या हॉलमध्ये होती तिथे इतर सदस्यही होते. बैठक सुरु झाल्यावर मी बाहेर गेले कारण मी सदस्य नाही. आरक्षणावर सरकार योग्य निर्णय घेणारच, ओबीसीला धक्का लागणार नाही."
पंकजा मुंडेंनी 'हे' मुद्दे मांडले : सूत्र
कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळतं आहे. आता कुणबी वगळून मराठा समाजाला लोकसंख्येच्या आधारे आरक्षण द्यावे. मागास आयोगाने सर्वेक्षण करताना मराठा आणि कुणबी समाजाचं एकत्र सर्वेक्षण केले असेल तर आरक्षणाची टक्केवारी ठरवताना कुणबी समाजाला विचारात घेतलं जाणार आहे का याबाबत स्पष्टता यावी, असा मुद्दा पंकजा मुंडेंनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement