एक्स्प्लोर

खातेनिहाय आकडेवारी : कोणत्या मंत्रालयाने वर्षभरात किती निधी खर्च केला?

सगळ्यात जास्त रक्कम शालेय शिक्षण विभागाने 66% खर्च केली आणि सगळ्यात कमी सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त 9% रक्कम खर्च केली.

मुंबई : गेल्यावर्षी 2017-18 या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या बजेट पैकी आजपर्यंत फक्त 41% निधी खर्च करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर शेतकरी कर्जमाफीसाठी घोषित केलेल्या रक्कमेपैकी फक्त 38% रक्कमच खर्च करण्यात आल्याचे ही स्पष्ट झालं आहे. या वर्षात अर्थ खात्याने चार परिपत्रक काढून खर्च करु नये, असा इशारा इतर विभागांना दिला होता. 26 फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. 9 मार्च रोजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार वर्ष 2018-19 चा अर्थसंकल्प मांडणार आहेत. पण वर्ष 2017-18 मध्ये अर्थसंकलपात ज्या तरतुदी केल्या, त्यापैकी फक्त 41% रक्कम खर्च झाल्याची माहिती आहे. सगळ्यात जास्त रक्कम शालेय शिक्षण विभागाने 66% खर्च केली आणि सगळ्यात कमी सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त 9% रक्कम खर्च केली. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना सरकार फक्त घोषणा करत आणि तेवढी रक्कम खर्च करत नसल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेतकरी कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे राज्य सरकारने 32 हजार कोटींची कर्जमाफी घोषित केली. पण प्रत्यक्षात कर्जमाफीवर फक्त 12 हजार 249 कोटी रुपये खर्च केले. म्हणजे फक्त 38% रक्कम खर्च झाली. समर्थन अर्थसंकल्प अध्ययन विभागाने केलेल्या अभ्यासात या गोष्टी आढळून आल्या. सरकारने अनेक घोषणा केल्या, पण त्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने वर्ष 2017-18 मध्ये राज्य सरकारने चार परिपत्रक काढली आणि सर्व विभागांना विविध योजना राबवू नये, नोकरभरती करु नये आशा सक्त सूचना दिल्या. एप्रिल, जुलै, ऑगस्ट आणि जानेवारी 2018 अशा चार महिन्यात परिपत्रक काढून खर्च नियंत्रण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विभागनिहाय तरतूद आणि खर्च : शालेय शिक्षण विभाग तरतूद - 48 हजार 968 कोटी बजेट खर्च - 34 हजार पाच कोटी (म्हणजे 66% निधी खर्च) महिला व बालकल्याण विभाग  तरतूद - 3109 कोटी खर्च - 1906 कोटी (म्हणजे 58% निधी खर्च) सार्वजनिक आरोग्य तरतूद - 10 हजार 755 कोटी खर्च - 6747 कोटी (म्हणजे 60% निधी खर्च) ग्रामीण विकास तरतूद - 19 हजार 163 कोटी खर्च -10,539 कोटी (म्हणजे 50% निधी खर्च) सार्वजनिक बांधकाम विभाग तरतूद - 15 हजार 336 कोटी खर्च - 6289 कोटी (म्हणजे 9 % निधी खर्च) सामाजिक न्याय विभाग तरतूद - 13 हजार 413 कोटी खर्च - 6905 कोटी (म्हणजे 46% निधी खर्च) आदिवासी विकास  तरतूद - 11 हजार 110 कोटी खर्च - 4169 कोटी (म्हणजे 30% निधी खर्च) सरकारने शेतकरी कर्जमाफी घोषित केली, ती सहकार आणि पणन विभागातून निधी उपलब्ध करुन दिला. त्या विभागाचे बजेट होते 35 हजार 236 कोटी, पण खर्च झाला 14 हजार 215 कोटी. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 साठी 31 हजार कोटींची तरतूद होती, पण प्रत्यक्षात 12,429 कोटी इतकाच निधी खर्च झाला. म्हणजे एकूण 38% रक्कम खर्च झाली. म्हणजे 62% रक्कम अजून खर्च झाली नाही. यातून सरकार नुसती घोषणा करते, पण अजून मोठ्या प्रमाणावर शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. इतकंच नाही तर शेतकरी कर्जमाफिसाठी आदिवासी विभागाचे दोन हजार कोटी रुपये वळते करण्यात आले होते. पण त्यापैकी एकही रुपये ज्या आदिवासी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यांना देण्यात आलेली नाही.
  • शेतकरी कर्जमाफी- 31 हजार कोटी तरतूद
  • आतापर्यंत खर्च – 12 हजार 429 कोटी
राज्यात सध्या पायाभूत सोयी सुविधांसाठी शहरी भागात अनेक प्रकल्प सुरु आहेत. बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, मेट्रो प्रकल्प यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहेत. असं असताना सामाजिक क्षेत्रासाठी केला जाणाऱ्या खर्चाला कात्री लावली जात असल्याचं चित्र आहे. त्यामुळे राज्यातील कुपोषण, बालमृत्यू, शाळा बंद करणे, आरोग्याच्या समस्या या मूलभूत गोष्टींकडे सरकारच दुर्लक्ष होत असल्याची टीका आता होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Tukaram Mundhe : हळद, जिरे ते तीळ-मोहरी, तुकाराम मुंढेंची नजर आता मसाल्यातील भेसळीवर; भेसळ केल्यास सात वर्षांपर्यंत शिक्षा, 10 लाखांचा दंड
हळद, जिरे ते तीळ-मोहरी, तुकाराम मुंढेंची नजर आता मसाल्यातील भेसळीवर; भेसळ केल्यास सात वर्षांपर्यंत शिक्षा, 10 लाखांचा दंड
बेरोजगार सुषमाताईंचा अभ्यास कमीच पडला, शिळ्या कढीला ऊत आणण्यापेक्षा अभ्यास करा, विक्रम पाचपुतेंचा हल्लाबोल  
बेरोजगार सुषमाताईंचा अभ्यास कमीच पडला, शिळ्या कढीला ऊत आणण्यापेक्षा अभ्यास करा, विक्रम पाचपुतेंचा हल्लाबोल  
Sushma Andhare : नागपूरच्या एकाच सेंटरवरून 24 विद्यार्थी कसे टॉपर? माथाडी निरीक्षक भरतीत घोटाळा झाल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप, MPSC चे स्पष्टीकरण
नागपूरच्या एकाच सेंटरवरून 24 विद्यार्थी कसे टॉपर? माथाडी निरीक्षक भरतीत घोटाळा झाल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप, MPSC चे स्पष्टीकरण

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Embed widget