एक्स्प्लोर
मुंबईतील पवई लेकमध्ये हाऊसबोट उलटली, तिघे बेपत्ता

मुंबई : मुंबईतील पवईच्या तलावात बोट उलटली आहे. यात बोटीतील आठही जण पाण्यात बुडाले. काल रात्री ही दुर्घटना घडली आहे. बोटीतील प्रवासी पार्टी करण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला आहे. पवई तलावात रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास ही बोट उलटली. बुडालेली बोट हाऊस बोट असल्याचं समोर आलं आहे. बोटीतील आठही जण पाण्यात बुडाले, मात्र त्यापैकी दोघांना स्थानिकांनी वाचवलं. तर तिघे स्वत: पाण्यातूव पोहत वर आले. बुडालेले तिघेजण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध पोलीस आणि अग्नीशमन दलाकडून सुरु आहे. ही हाऊसबोट एका रॉडला अडकून उलटली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हाऊसबोटीवर पवई तलावात कायदेशीर बंदी असतानाही ही बोट कशी काय वापरली जात होती, याचा शोध सुरु आहे. तसंच या पार्टीला परवानगी कोणी दिली याचीही चौकशी सुरु आहे.
Before You Go
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















