Maharashtra Winter Assembly Session : कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठी नियुक्त असलेले काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारीच गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची विधानसभेत (Maharashtra Winter Assembly Session) लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली आहे. 


एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात वळसे पाटील यांनी सांगितलं आहे की,  पोलीस सेवेतून निलंबित केलेल्या परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अखिल भारतीय सेवा शिस्तभंगाची कारवाई सुरु आहे.  तसेच आणखी 28 अधिकार्‍यांविरोधात निलंबनाच्या कारवाईची शिफारस गृहखात्याला प्राप्त झाली आहे.  मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या निलंबनाच्या प्रस्तावाबाबत अबू आझमी यांनी विधानसभेत लेखी प्रश्न विचारला होता. त्याला वळसे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. 


वळसे पाटील यांनी उत्तरात सांगितलं आहे की,  परमबीर सिंह यांच्यासह 30 पोलीस अधिकारी- कर्मचार्‍यांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.  या गुन्ह्यांच्या निपक्षपतीपणे तपास करण्यासाठी त्यांना सेवेत ठेवणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी सरकारला दिला आहे.  यामध्ये पाच पोलीस उपायुक्त आणि पाच सहायक आयुक्त दर्जाच्या पोलिसांचा समावेश आहे, अशीही माहिती वळसे पाटलांनी दिली आहे. 


याबाबत काय अनियमितता झाली. याचा तपशील अहवाल गृह खात्याने मागवला आहे.  हवालानुसार परमबीर सिंह आणि पराग मणेरे यांचे निलंबन करण्यात आल्याची गृहमंत्र्यांनी माहिती दिली आहे. 


राज्यातील फॉरेन्सिक लॅबमध्ये शेकडो प्रकरणे प्रलंबित
एका दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात  राज्यातील फॉरेन्सिक लॅबमध्ये शेकडो प्रकरणे प्रलंबित असल्याचंही वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. बालकांवरील लैंगिक अत्याचार (पोस्को)  संबंधित 1185 तर महिलांवरील गुन्ह्यासंबंधीत  डीएनएची 925 प्रकरण प्रलंबित आहे. फॉरेन्सिक लॅबमध्ये मनुष्यबळ कमतरता आणि तंत्रज्ञान कमतरतेमुळे प्रकरणे प्रलंबित असल्याचं  गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ताराकिंत प्रश्नाला उत्तर देताना  सांगितलं आहे. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha