Maharashtra Winter Assembly Session : आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे. यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्याआधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच शाब्दिक 'वॉर' रंगल्याचं चित्र आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर थेट टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी दुसऱ्याकडे चार्ज द्यायला हवा अशी आमची मागणी आहे. शिवसेनेतील कुणाला तरी त्यांनी चार्ज द्यायला हवा, असंही त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहावं. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर त्यांनी द्यायला हवी. त्यांची तब्येत ठीक नाही, असं ते म्हणाले.
45 दिवस झाले मुख्यमंत्री नाहीत. या पदाचा चार्ज आदित्य ठाकरे किंवा इतर कोणाकडे तरी द्यायला हवा. चंद्रकांत पाटील म्हणाले की, मागील 2 वर्षांपासून सर्व सिस्टम कोलॅप्स झाल्या आहेत. सरकारचा अधिकाऱ्यांवर धाक राहिलेला नाही. त्यामुळे माहिती समोर येतेय की अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी रडारवर आहेत. यामध्ये तथ्य असू शकतं, असं पाटील म्हणाले.
पाटील यांनी म्हटलं की, राज्याचे पोलीस सक्षम किती आहेत हे दिसलं आहे. लोकशाहीमध्ये आम्हाला काही मागणी करण्याचा अधिकार आहे, असं ते म्हणाले. संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, नरेंद्र मोदींचं मुखदर्शन झालं नसलं तरी ते सर्व ठिकाणी कार्यशील आहेत. ते उपलब्ध नाहीत असं नाही. मुख्यमंत्र्यांनी किमान आदित्य ठाकरे यांना तरी चार्ज द्यावा परंतु त्यांच्यावर देखील मुख्यमंत्र्यांचा विश्वास नाही का? असा टोलाही त्यांनी लगावला.
आजपासून अधिवेशनाला सुरुवात
हिवाळी अधिवेशनाला नागपूरऐवजी मुंबईतून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हं आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Omicron in Maharashtra : अधिवेशनावर कोरोनाचं संकट, RTPCR टेस्टमध्ये 10 जणांचा अहवाल पॉजिटिव्ह
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha