Rohit Pawar tweet : गट क संवर्गातील रिक्त असलेल्या 900 पदांसाठी MPSC ने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये तांत्रिक सहायक (विमा संचालनालय) आणि उद्योग निरीक्षक या दोन पदांचाही नव्याने समावेश केला आहे. यामुळं अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळेल, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. या निर्णयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  राज्यमंत्री  दत्ता भरणे यांचे त्यांनी आभार मानले आहेत. शिवाय MPSC च्या मुलांचे इतर प्रश्नही आपण अशाचप्रकारे मार्गी लावाल, असा विश्वास आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.






MPSCकडून 'महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021' साठी जाहीर करण्यात आलेल्या पदांमध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभागातील विविध जागांचा सामावेश आहे.या सर्व पदांसाठी 100 गुणांची एका तासाची बहुपर्यायी पूर्व परीक्षा होईल. त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल. 


उद्योग निरीक्षक (गट क) - 103 पदे
दुय्यम निरीक्षक (गट क)- 114 पदे
तांत्रिक सहाय्यक (गट क) - 14 पदे
कर सहाय्यक  (गट क) - 117 पदे
लिपिक-टंकलेखक (मराठी) - 473 पदे
लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) - 79 पदे


एमपीएससीच्या संकेतस्थळावर 22 डिसेंबर 2021 ते 11 जानेवारी2022 पर्यंत वरील पदांसाठी अर्ज करता येईल. संयुक्त परीक्षा पूर्व परीक्षा ( गट क ) 2021 परीक्षा 3 एप्रिल 2022  रोजी होणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Nitin Gadkari : देशातील श्रीमंतांच्या यादीत कोल्हापूरकर अव्वल कसे? नितीन गडकरींनी कारण सांगितलं! 
येत्या सहा महिन्यात वाहनांना 'फ्लेक्स फ्यूएल इंजिन' बंधनकारक; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती
मिनी मेट्रोचं 'विदर्भ सर्किट'; विदर्भातल्या प्रमुख शहरांना नागपूरशी मिनी मेट्रोनं जोडणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha