एक्स्प्लोर

आपत्ती व्यवस्थापनावरुन हायकोर्टाने राज्य सरकारला पुन्हा सुनावलं

आपत्ती व्यवस्थापनाच्या मुद्यावर राज्य सरकारची अनास्था पाहत मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई : 'केवळ बजेटच्या श्वेतपत्रिकेवर आपत्कालीन यंत्रणेसाठी विशेष निधीची तरतूद करुन उपयोग नाही. तो निधी ताबडतोब त्या विभागाच्या खात्यात जमा व्हायला हवा, तरच त्याला अर्थ आहे. नाहीतर नेहमीप्रमाणे योजना केवळ कागदावरच राहतील' अशा शब्दात हायकोर्टाने राज्य सरकारची कानउघडणी केली. राज्यातील काही जिल्ह्यात नाममात्र पाऊस झाल्याने पुन्हा एकदा दुष्काळाचं संकट महाराष्ट्रावर घोंघवत आहे. मात्र तरीही आपत्ती व्यवस्थापनाच्या मुद्यावर राज्य सरकारची अनास्था पाहत मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कायद्यानुसार आपत्ती व्यवस्थापनाच्या विभागासाठी दोन स्वतंत्र बँक खाती उघडण्याची तरतूद आहे. त्यानुसार या खात्यात आतापर्यंत किती निधी जमा झाला? याची माहिती पुढील सुनावणीच्या वेळी सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने सरकारी वकिलांना दिले. तसेच राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबत कल्पना द्या अश्या सूचनाही हायकोर्टाने दिल्या आहेत. वारंवार आदेश देऊनही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र आपत्ती व्यावस्थापन यंत्रणा तयार करण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा अस्तित्त्वात येऊन एक तप उलटलं तरी त्याची योग्यप्रकारे अंमलबजावणी का होत नाही? असा संतप्त सवाल हायकोर्टाने विचारला. सामाजिक कार्यकर्ता संजय लाखे पाटील यांनी यासंदर्भात हायकोर्टात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरु आहे. राज्यात उद्भवलेला दुष्काळ,  दुष्काळसदृश्य आणि आपत्कालीन परिस्थिती यावर राज्य सरकारने गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. मुंबईसह राज्यभरात दिवसेंदिवस नवनव्या आपत्तींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या संकटांचा समावेश आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पाणी तुंबण्याची समस्या, ब्रिज कोसळणे असो किंवा जुन्या इमारती कोसळणे यासारख्या गोष्टी नित्यनियमाच्या झाल्याबद्दल हायकोर्टाने याआधीच नाराजी व्यक्त केली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू होऊन तब्बल बारा वर्ष उलटून गेली. तरीही राज्य सरकारनं अजूनही या कायद्यातील तरतूदी गांभीर्याने घेतलेल्या नाहीत, यावरही हायकोर्टाने बोट ठेवलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सामान्य प्रशासन विभागाचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानची वृत्तपत्रे करणार बंद 
सामान्य प्रशासन विभागाचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानची वृत्तपत्रे करणार बंद 
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget