एक्स्प्लोर
वाशी टोलनाक्यावर 4 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

नवी मुंबई : टोलनाके आज पुन्हा सुरु झाल्यानंतर सुट्ट्या पैशांच्या अडचणीमुळे वाशी टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली आहे. मुंबईकडे येताना वाशी टोलनाक्यावर जवळपास 3 ते 4 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा आहेत. नोटाबंदीनंतर देशभरात टोलनाके सुरु झाले. मात्र सुट्ट्या पैशांचा तुटवडा असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. याचा मनस्ताप मुंबईच्या प्रवेशद्वारावरच प्रवाशांना सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे पिवळ्या रेषेपेक्षा जास्त मोठी रांग लागल्यास टोल न घेता वाहने सोडण्याचे सरकारचे आदेश आहेत. मात्र याचं देखील कुठे पालन होताना दिसत नाही. सायन पनवेल हायवेवर सायनकडे म्हणजे मुंबईकडे येताना वाशी टोलनाक्यापासून 3-4 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा आहेत. तर नवी मुंबईकडे जाताना देखील वाशीपुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
राजकारण























