एक्स्प्लोर

अनिल देशमुखांनी सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर गुरूवारी हायकोर्टाचा फैसला

सीबीआयनं केवळ राजकिय सूडापोटी आपल्याविरोधात एफआयआर घेतली, मुख्य सूत्राधार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं यात का घेतली नाहीत? देशमुखांचा सवाल

मुंबई : अनिल देशमुखांनी सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी सोमवारी पूर्ण झाली. मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भातील आपला निकाल राखून ठेवला आहे. याआधी याच प्रकरणात सीबीआयनं दाखल केलेल्या एफआयआरमधील दोन परिच्छेद वगळण्यासाठी राज्य सरकारनंही याचिका दाखल केलीय. या दोन्ही याचिकांवर न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

अनिल देशमुख यांची याचिका काय?
आपल्याविरोधात कोणतेही पुरावे तपासयंत्रणेकडे नाहीत. सीबीआयनं केवळ राजकिय सूडापोटी आपल्याविरोधात एफआयआर घेतली आहे. या कथित आरोपांमागील मुख्य सूत्राधार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं यात का घेतली नाहीत? त्यांचा सीबीआय काहीच तपास का करत नाही? असे सवाल अनिल देशमुखांनी या याचिकेतून उपस्थित केले आहेत. मात्र, देशमुखांचे हे सारे आरोप बिनबुडाचे असून तपासयंत्रणा या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे, सर्व बाजूंनी चौकशी करून तपास सुरू आहे असा दावा सीबीआयच्यावतीनं करण्यात आला. हा निकाल राखून ठेवताना सीबीआयला तपासाचा अहवाल हायकोर्टात सीलबंद पाकिटात सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.

राज्य सरकारची सीबीआयविरोधात याचिका काय?
परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांविरोधात केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर सीबीआयच्यावतीनं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमधील दोन परिच्छेद वगळण्यात यावेत अशी मागणी करत राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जामदार यांच्या खंडपीठापुढे बुधवारी व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, सचिन वाझेंच्या पुनर्नियुक्तीची गृहमंत्री देशमुख यांना माहिती होती, तसेच त्यांची त्याला सहमतीही होती असा सीबीआयनं दाखल केलेल्या एफआयआरमधील उल्लेख चुकीचा आणि अयोग्य असल्याचे सांगत परमबीर आणि त्यांच्या अन्य दोन आयुक्तांच्या समितीने घेतलेला तो निर्णय होता. त्यात गृहमंत्र्यांचा काहाही संबंध नसल्याचा दावा राज्य सरकारच्यावतीने ज्येष्ठ वकिल रफिक दादा यांनी केला. 

सीबीआयने फक्त परमबीर यांच्या कार्यकाळातीलच नव्हे तर संपूर्ण पोलीस दलातील बदल्यांसदर्भातील फाईल मागविल्या आहेत. मुळात याच मागणीला आमचा विरोध आहे. न्यायालयाने असे कोणतेही आदेश दिले नसतानाही सीबीआय मागच्या दाराने इतर प्रकरणातही माहिती घेऊ पाहत आहे, याचा रफिक दाद यांनी पुर्नउल्लेख केला. तसेच सीबीआय आपल्या मर्यादेचं उल्लंघन करीत असल्याचे सागंत अनिल देशमुखांविरोधातील सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमधील 4 आणि 5 हे दोन्ही परिच्छेद या प्रकरणाशी संबंधित नाहीत त्याबाबत राज्य सरकार चौकशी करण्यास समर्थ आहे. त्यामुळे हे दोन्ही परिच्छेदांना एफआयआरमधून वगळण्यात यावे, अशी मागणी राज्य सरकारनं हायकोर्टाकडे केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या जाहीर आरोपांची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला तपासाचे निर्देश दिले आहेत. सीबीआयनं याप्रकरणी अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हा गुन्हा रद्द करण्यासाठी देशमुखांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात ज्या ज्या व्यक्तिंची नावं समोर येत आहेत त्यांचीही चौकशी सीबीआयने करायला हवी, केवळ देशमुख यांचीच चौकशी करता कामा नये. ज्या समितीनं सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेतलं त्यांचीही चौकशी करायला हवी, अशी सूचना या सुनावणी दरम्यान हायकोर्टानं केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ही चौकशी सुरु झाली आहे, त्यामुळे एफआयआरमध्ये म्हटल्याप्रमाणे तपास सर्वांविरोधात व्हायला हवा, असंही हायकोर्टानं स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : 'हि कसली मर्दानगी, देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधलेत?' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंवरून आदित्य ठाकरेंचा प्रहार; एकनाथ शिंदेंवरही सडकून टीका
'हि कसली मर्दानगी, देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधलेत?' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंवरून आदित्य ठाकरेंचा प्रहार; एकनाथ शिंदेंवरही सडकून टीका
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
विधानपरिषदेत बच्चू कडू आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव, सभापतींनी मागवला खुलासा
विधानपरिषदेत बच्चू कडू आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव, सभापतींनी मागवला खुलासा
Maharashtra Legislative Council Video : 'मी बोलायचे का नाही, हे तुम्ही सांगणारे कोण?’; विधान परिषदेत बच्चू कडू-प्रवीण दरेकर पुन्हा आमनेसामने, सभापतींना करावी लागली मध्यस्थी
'मी बोलायचे का नाही, हे तुम्ही सांगणारे कोण?’; विधान परिषदेत बच्चू कडू-प्रवीण दरेकर पुन्हा आमनेसामने, सभापतींना करावी लागली मध्यस्थी

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्यामुळं अवैध कामं करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत, निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा
तुकाराम मुंढे यांची निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा, मंत्री झिरवाळांकडून अखेर शब्द घेतलाच
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
Bhaskar Jadhav: राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Embed widget