एक्स्प्लोर

वीस आठवड्यांनंतर जर गर्भवतीच्या जीवाला गंभीर धोका असेल, तर गर्भपाताला आमच्या परवानगीची गरज नाही - हायकोर्ट

बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचे पालनपोषण करण्याची आर्थिक परिस्थिती अनेकदा पालकांकडे नसते. अशा वेळी राज्य सरकारने या मुलांचे पालकत्व स्वीकारायला हवे, असेही न्यायालयाने आपल्या निर्देशांमध्ये स्पष्ट केले आहे.

मुंबई : जर 20 आठवड्यांहून अधिक दिवसांची गर्भवती असलेल्या महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर आणि तिच्या जीवाला धोका निर्माण करणारी असेल, तर तिच्या गर्भपाताचा निर्णय नोंदणीकृत वैद्यकीय तज्ज्ञांनी घ्यावा. आमच्या परवानगीची आवश्‍यकता नाही, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र ही मुभा केवळ आणि केवळ महिलेच्या जीवाला अत्यंत धोका असेल, तरच विचारात घेतली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. जर इच्छा नसतानाही बाळाचा जन्म झाला आणि त्याला वैद्यकीय उपचारांची आवश्‍यकता असेल तर त्यासाठी रुग्णालयांनी योग्य ते उपचार करावेत. अशा प्रकरणांमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचे पालनपोषण करण्याची आर्थिक परिस्थिती अनेकदा पालकांकडे नसते. अशा वेळी राज्य सरकारने या मुलांचे पालकत्व स्वीकारायला हवे, असेही न्यायालयाने आपल्या निर्देशांमध्ये स्पष्ट केले आहे. याबाबत न्यायालयाने राज्य सरकारला धोरण ठरवण्याचे निर्देश देत यासंदर्भातील पुढील सुनावणी 8 जुलैपर्यंत तहकूब केली आहे. 20 आठवड्याहून अधिक दिवसांच्या गर्भवती असलेल्या परंतु जीवाला धोका असल्यामुळे गर्भपात करण्याची मागणी करणाऱ्या तीन नव्या याचिका हायकोर्टात दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती महेश सोनाक यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार 20 आठवड्यापर्यंत गर्भपाताची परवानगी महिलांना देण्यात आलेली आहे. यापुढील कालावधीसाठी हायकोर्टाकडून परवानगी मिळणे सक्तीचे आहे. मात्र हल्ली अशा प्रकारच्या याचिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकतर आईच्या आणि गर्भाच्या जीवाला धोका असल्याचे कारण या याचिकांमध्ये असते किंवा गरोदर महिलेचं मानसिक आरोग्य अस्वस्थ होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आलेली असते. त्यामुळे अशा याचिकांबाबत ठोस नियमावली तयार करणे गरजेचे आहे, असं मत यावेळी हायकोर्टाने व्यक्त केलं.

महत्त्वाच्या बातम्या

..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
लवकरच शेतकऱ्यांना कर्ज नील झाल्याचे सर्टीफीकेट मिळणार, दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफ होणार, मंत्री दत्रात्रय भरणेंची माहिती
लवकरच शेतकऱ्यांना कर्ज नील झाल्याचे सर्टीफीकेट मिळणार, दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफ होणार, मंत्री दत्रात्रय भरणेंची माहिती

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget