News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

शरद पवारांविरोधातील अण्णा हजारेंची याचिका हायकोर्टाने फेटाळली!

FOLLOW US: 
Share:
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांतील घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. यासंदर्भात अण्णांनी मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने अण्णा हजारेंची याचिका तूर्तास फेटाळली आहे. आधी संबंधित सहकारी कारखान्यांबाबत तक्रार दाखल करा, त्यानंतर आदेश देऊ, असंही मुंबई हायकोर्टाने अण्णा हजारेंच्या याचिकेवर स्पष्ट सांगितलं. विशेष म्हणजे सहकारी साखर कारखान्यांमधील या घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोप हजारे यांनी केला होता. अण्णांनी याचिकेत सहकारी कारखान्यांच्या खासगीकरणावर आक्षेप घेतला होता. शिवाय, कमी किंमतीत कारखाने खरेदी केल्याचा आरोपही केला होता. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून याप्रकरणात शरद पवार आणि अजित पवार यांची चौकशी करण्याची मागणी अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात याचिकेद्वारे केली होती.

संबंधित बातम्या :

अण्णा हजारेंवर मानहानीचा खटला भरण्याचा विचार : पवार

सहकारी साखर कारखान्यात 25 हजार कोटींचा घोटाळा : अण्णा हजारे
Published at : 06 Jan 2017 05:58 PM (IST) Tags: मुंबई हायकोर्ट hc अण्णा हजारे शरद पवार sharad pawar Anna Hazare

आणखी महत्वाच्या बातम्या

महाविकास आघाडी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार? भास्कर जाधव किंवा आदित्य ठाकरेंच्या नावाची वर्णी?

महाविकास आघाडी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार? भास्कर जाधव किंवा आदित्य ठाकरेंच्या नावाची वर्णी?

Raj Thackeray: मनसेचे उमेदवार म्हणाले, ती खूप मोठी चूक झाली; राज ठाकरेंसमोर बैठकीत नाराजी जाहीर केली!

Raj Thackeray: मनसेचे उमेदवार म्हणाले, ती खूप मोठी चूक झाली; राज ठाकरेंसमोर बैठकीत नाराजी जाहीर केली!

मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?

मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?

Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार

Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार

Raj Thackeray: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमुळे राज ठाकरेंचे 3 प्रमुख उमेदवार पराभूत; धक्कादायक आकडेवारी समोर

Raj Thackeray: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमुळे राज ठाकरेंचे 3 प्रमुख उमेदवार पराभूत; धक्कादायक आकडेवारी समोर

टॉप न्यूज़

Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....

Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....

Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 

Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 

मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर

मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर

Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी

Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी