एक्स्प्लोर
कल्याण रेल्वे स्थानकात 53 लाखांचं सोनं जप्त
कल्याण स्थानकातून हैद्राबादला जाणाऱ्या हुसेनसागर एक्स्प्रेसमध्ये शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
मुंबई : कल्याण रेल्वे स्थानकातून तब्बल 53 लाख रुपयांचं बेहिशोबी सोनं जप्त करण्यात आलं आहे. आरपीएफच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली.
कल्याण स्थानकातून हैद्राबादला जाणाऱ्या हुसेनसागर एक्स्प्रेसमध्ये शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. या गाडीने बेताल सिंग नावाचा प्रवासी बेहिशोबी सोनं घेऊन जाणार असल्याची माहिती आरपीएफ गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यामुळे या प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे असलेल्या सुटकेसमध्ये 53 लाख रुपयांचं सोनं आढळून आलं. ज्याची कुठलीही पावती त्याच्याकडे नव्हती.
त्यामुळे त्याला आणि त्याचा मुकादम प्रल्हादसिंग भंवर याला ताब्यात घेण्यात आलं. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता आयकर विभागाला सोपवण्यात आला असून दोन्ही इसमांची आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
भारत
Advertisement