एक्स्प्लोर

अभ्यासिका सुरू करण्याची परवानगी द्या नाहीतर आमची कुटुंब रस्त्यावर येतील : अभ्यासिका ओनर्स असोसिएशन

आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर अभ्यासिका सुरू करण्याची परवानगी द्या, अशी मागणी अभ्यासिका ओनर्स असोसिएशनने केली आहे. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहण्यात आलं आहे.

मुंबई : राज्यात टाळेबंदीला जाहीर होऊन आजअखेर आता साडेतीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. या टाळेबंदीमुळे अनेक व्यवसाय बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. ही परिस्थिती थांबण्यासाठी आणि अनेक कुटुंबांची व्यवसाय बंद असल्यामुळे होणारी आर्थिक कुचंबणा थांबवण्यासाठी हळूहळू अनेक व्यवसायांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अद्याप अभ्यासिका सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी परवानगी देण्याची मागणी अभ्यासिका ओनर्स असोसिएशनने केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत घोषणा देखील केली आहे. ही बाब लक्षात घेत आता राज्यभरात बंद असणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी असणाऱ्या अभ्यासिका आता पुन्हा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी अभ्यासिका ओनर्स असोसिएशनने खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे. आगामी 13 सप्टेंबरला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी तब्बल 3 लाख 80 हजार विद्यार्थी बसणार आहेत. यातील अनेक विद्यार्थी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर याठिकाणी अभ्यासासाठी येतं असतात. परंतु, टाळेबंदीमुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासासाठी घरीच थांबण्याची वेळ आली आहे. सध्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी खूप कमी कालावधी शिल्लक आहे. या परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासिका सुरू करण्यात आल्या तर अनेक विद्यार्थ्यांना दिलासा भेटेल.

अभ्यासिका सुरू करण्याची परवानगी द्या नाहीतर आमची कुटुंब रस्त्यावर येतील : अभ्यासिका ओनर्स असोसिएशन अभ्यासिका सुरू करण्याची परवानगी द्या नाहीतर आमची कुटुंब रस्त्यावर येतील : अभ्यासिका ओनर्स असोसिएशन

अभ्यासिका चालवणे सध्या अवघड यासोबतच या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाना देखील दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया निलेश निंबाळकर या अभ्यासिका चालक तरुणाने दिली आहे. याबाबत आणखी बोलताना निलेश निंबाळकर म्हणाले की, टाळेबंदीमुळे आमचा पूर्णपणे व्यवसाय बंद आहे. सध्या अशी परिस्थिती आहे की, अनेक अभ्यासिका चालकांचे मागील तीन ते चार महिन्यांचे भाडे थकले आहे. यासोबतचं लाईट बील देखील आहे. अनेकांना भाडे देता न आल्यामुळे मूळ मालकांनी अभ्यासिकेला टाळे मारून आतील सर्व साहित्य आपल्या ताब्यात घेतले आहे. आता परिस्थिती अशी आहे की, रखडलेले इतके पैसे आता कुठून अचानक भरायचे. जर आम्हाला अभ्यासिका सुरू करण्यास परवानगी मिळाली तर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेल्या टाळेबंदीच्या नियमांचं तसेच अभ्यासिकेत सॅनिटायझरचा वापर करणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टनस राखणे या नियमांचं पालन करू.

दिल्ली मधील विद्यापीठांच्या परीक्षा रद्द; लवकरचं पदवी प्रमाणपत्र मिळणार : मनीष सिसोदिया

याबाबत बोलताना अभ्यासिका ओनर्स असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष एजाज शेख म्हणाले की, अभ्यासिका चालकांची पूर्णपणे कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. ती रोखण्यासाठी काही निर्बंध घालून प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी अभ्यासिका सुरू करण्यात याव्यात. मुंबईत जवळपास सहाशे ते सातशेच्या आसपास अभ्यासिका आहेत तर एकट्या पुण्यात दीड ते दोन हजारांच्या आसपास अभ्यासिका आहेत. SSC HSC Results | दहावीचा निकाल 15-20 जुलै दरम्यान तर, बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget