एक्स्प्लोर
Advertisement
प्रियकरावरील बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पोलिसाकडून बलात्कार
सतीश माझा प्रियकर असून आम्हा दोघांचे परस्पर संमतीने शारीरिक संबंध आहेत. त्यामुळे प्रियकर सतीशवरील बलात्काराचा गुन्हा मागे घ्या, असा तगादा तिने पोलिसांकडे लावला होता. मात्र तुझ्या प्रियकराला सोडवायचं असेल, तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, असं सांगून पीएसआयने ब्लॅकमेल केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
भिवंडी : प्रियकरावरील बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पोलिस उपनिरीक्षकानेच ब्लॅकमेल करत बलात्कार केल्याचा आरोप मुंबईतील 23 वर्षीय तरुणीने केला आहे. पीडित तरुणीने भिवंडीतील कोनगाव पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पोलीस उपनिरीक्षक रोहन गोंजारी भिवंडीतील शांतीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.
तक्रारदार तरुणी मुंबईत राहणारी असून तिची काकी भिवंडी परिसरात राहते. सुट्टीत पीडिता काकीच्या घरी जात असे. भिवंडीत राहणाऱ्या सतीश नक्कलवार नामक विवाहित पुरुषाशी तिचं 2015 साली सूत जुळलं. तेव्हापासून तीन वर्ष त्यांचे प्रेमसंबंध होते. सतीशला दोन मुलं असल्याची माहिती असूनही दोघांचं अफेअर सुरु होतं.
दरम्यानच्या काळात सतीशची पहिली प्रेयसी राबियाला पीडिता आणि सतीश यांच्या प्रेमसंबंधांची कुणकुण लागली. तिने पीडित तरुणीला फोन करुन आपले आणि सतीशचे प्रेमसंबंध आधीपासून असल्याचं बजावलं. त्याचा पिच्छा सोडण्याची ताकीदही तिला दिली. तरीही पीडित तरुणी आपल्या प्रियकराशी शारीरिक संबंध ठेवत असल्याचं तिला समजलं.
'सतीशची मैत्रीण राबियाने आपल्याला प्रेमसंबंध तोडण्यास सांगितलं. अन्यथा याविषयी माझ्या घरच्यांना सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे माझं सतीशसोबत भांडण झालं. तू माझ्याशी संबंध ठेवू नकोस आणि माझ्या घरी येऊ नकोस, असं मी त्याला सांगितलं. परंतु सतीशनेही घरी येऊन सर्वांना सांगण्याची भीती दाखवली. त्यामुळे मी घाबरले' असं पीडितेने सांगितलं.
त्याच काळात, राबियाने पीडित तरुणीला आपल्या घरी बोलावलं. तिला पाण्यातून गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केलं. त्यानंतर तिच्यावर सलीम नावाच्या तरुणाकडून बलात्कार करवून घेतला. या प्रकाराचे चित्रीकरण राबियाने मोबाईलमध्ये केले. दुसऱ्या दिवशी राबियाने हा व्हिडीओ पीडित तरुणीला दाखवला. तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली, असा दावा पीडितेने केला.
घाबरुन पीडितेने राबियाला 43 हजार रुपये दिले. तरीही तिला धमकी देण्याचा प्रकार सुरु असल्याने आपली समाजात बदनामी होईल, या भीतीने आणि या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून जुलै 2018 मध्ये तिने मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावर कुलाबा पोलिसांनी शून्य क्रमांकाने बलात्काराचा गुन्हा प्रियकर सतीश, त्याची मैत्रीण राबिया आणि सलीम विरोधात दाखल केला. गुन्हा भिवंडीतील शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पीडित तरुणीला शांतीनगर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी तिघाही आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या.
अत्याचाराच्या या घटनाक्रमाला खुद्द पीडित तरुणीने कलाटणी दिली. सतीश माझा प्रियकर असून आम्हा दोघांचे परस्पर संमतीने शारीरिक संबंध आहेत. त्यामुळे प्रियकर सतीशवरील बलात्काराचा गुन्हा मागे घ्या, असा तगादा तिने पोलिसांकडे लावला होता. मात्र या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना शांतीनगर पोलिसांनी अटक करुन त्यांची रवानगी कारागृहात केली होती. पीडित तरुणीच्या माहितीनुसार तिने कोर्टासमोरही प्रियकर सतीशने अत्याचार केला नसून परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवल्याचं नमूद केलं होतं.
याच गुन्ह्यातील तपास अधिकारी रोहन गोंजारी यांनी खोटा गुन्हा दाखल केला म्हणून कारवाई करण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेने केला. तुझ्या प्रियकराला सोडवायचं असेल, तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, असं सांगून ब्लॅकमेल केल्याचा आरोपही पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबानीत केला आहे.
पोलिस उपनिरीक्षक गोंजारी यांनी राजनोली नाक्यावर बोलवले. त्यानंतर कल्याण रेल्वे स्टेशन समोरील कल्याण गेस्ट हाऊस या लॉजवर नेऊन बलात्कार केला, असा आरोप पीडितेने केला आहे. धक्कादायक बाब, म्हणजे पोलिस उपनिरीक्षक गोंजारी यांनी 'आपण सहखुशीने पोलिस उपनिरीक्षक रोहन गोंजारी यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत आहोत' असं कागदावर लिहून सही घेतल्याचंही पीडित तरुणीने कोनगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या जबानीत म्हटल आहे. पोलिसांवर कारवाई करुन कठोर शिक्षा देण्याची मागणी तिने केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement