(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gas cylinder blast in Dombivali : डोंबिवलीतील गायकवाडवाडी परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट, तीन महिलांसह पाच वर्षाचा मुलगा जखमी
Gas cylinder blast in Dombivali : डोंबिवलीत झालेल्या स्फोटाची मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी दखल घेतली आहे. जखमींचा झालेल्या रुग्णांचा रुग्णालयाचा खर्च मुख्यमंत्री व्यक्तिगत करणार आहेत.
डोंबिवली : डोंबिवलीतील गायकवाडवाडी परिसरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट (Gas cylinder blast in Dombivali) घडला आहे. पारसनाथ इमारतीतील तळमजल्यावरील घरात हा स्फोट झाला. या स्फोटात महिलेसह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका पाच वर्षीय मुलाचाही समावेश आहे.
डोंबिवलीत झालेल्या या स्फोटात मनीषा मोर्वेकर, उर्सुला लोढाया आणि पाच वर्षाचा मुलगा रीयांश लोढाया हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या तीन घरांचे देखील नुकसान झाले आहे. मनीषा मोर्वेकर यांच्या घरात गॅस लिकेजमुळे हा स्फोट झाला असावा असा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केला आहे.
डोंबिवलीत झालेल्या स्फोटाची मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी दखल घेतली आहे. जखमींचा झालेल्या रुग्णांचा रुग्णालयाचा खर्च मुख्यमंत्री व्यक्तिगत करणार आहेत.
आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. ही माहिती डोंबिवलीचे माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी दिली आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील पारसनाथ को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या तळमजल्यावर मनीषा मोरवेकर आपल्या पतीसह राहतात. आज संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात भीषण स्फोट झाला. नेमक्या या वेळी दुर्दैवाने उर्सुला आपला मुलगा रियांश याला क्लास वरून घरी घेऊन येत होत्या. इमारतीच्या जिन्याने वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आई आणि मुलगा मोर्वेकर यांच्या दरवाजासमोर असतानाच हा भीषण स्फोट झाल्याने यात ते दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी दखल करण्यात आले आहे .दरम्यान घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सिलेंडरमधून गॅस गळती झालेली असताना विजेचे बटन दाबले गेल्याने त्यातून हा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या दुर्घटनेत मोर्वेकर यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर मोर्वेकर यांच्यासह त्यांच्या आजूबाजूच्या तीन घराचे नुकसान झाले आहे