एक्स्प्लोर

औरंगाबाद पाठोपाठ मुंबईतही कचराकोंडी?

मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांचा कचरा पालिका उचलणार नाही, अशी तंबी मुंबई महापालिकेनं दिली आहे.

मुंबई : एकीकडं औरंगाबादमध्ये कचराप्रश्न पेटलेला असतानाच, आता मुंबईतही कचराकोडींचं चित्र आहे. कारण गृहनिर्माण सोसायट्यांचा कचरा पालिका उचलणार नाही, अशी तंबी मुंबई महापालिकेनं दिली आहे. गृहनिर्माण सोसायट्यांनी यापुढं ओला आणि सुका कचरा वेगळा करावा, आणि त्यावर प्रक्रिया केंद्र उभारावी असं मनपानं सांगितलं आहे. मात्र या आदेशाचा सगळीकडे बोजवारा उडाल्याचं दिसत आहे. त्यामुळे वांद्रेसह अनेक भागात कचरा साठल्याचं पाहायला मिळतं आहे. विशेष म्हणजे, ज्या शिवसेनेची सत्ता महापालिकेवर आहे, त्याच शिवसेनाप्रमुखांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर कचऱ्याचे ढीग लागले आहेत. गेल्या आठवडाभरापासून या ठिकाणीहून कचरा उचलण्यात आलेला नाही आहे. काय आहे महापालिकेचा नियम? मुंबई महापालिकेने 20 हजार चौ.किमीपेक्षा मोठ्या भूखंडावरची गृहसंकुल किंवा ज्या ठिकाणी 100 किलोपेक्षा जास्त कचरा दररोज तयार होतो, अश्या रहिवासी इमारती, उपहारगृह यांना पालिकेची कचरा योजना राबवणं बंधनकारक आहे. त्यानुसार सोसाट्यांनी आपल्या आवारातच ओला-सुका कचरा यांचं वर्गीकरण करुन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारं केंद्र उभारायचं आहे. शिवाय, या केंद्रातून खतनिर्मिती करणंही बंधनकारक करण्यात आलं आहे. 3300 सोसायट्यांना नोटिसा पण आतापर्यंत फक्त एक हजार सोसायट्यांनीच कचरानिर्मिती केंद्र उभारले आहेत. तर उर्वरित 1328 सोसायट्यांना हा प्रकल्प राबवण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. तर 3 हजार 300 सोसायट्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, 13 सोसायट्यांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. एकीकडे महापालिकेनं जरी ‘मुंबई स्वच्छ’ रहावी म्हणून कचरा योजनेचा आराखडा तयार केला आहे. पण पालिकेच्या कचरा योजनेनचा आता बट्याबोळ उडण्याची शक्यता आहे. कारण, महापालिकेच्या नियमांनुसार, अनेक सोसायट्यांमध्ये कचरा वर्गीकरण आणि प्रक्रीया करण्याचा प्रकल्प सुरु झाला आहे. मात्र, पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सरसकट कुणाचाच कचरा उचलणार नाही अश्या अवि्र्भावात आहेत. त्यामुळे, सुक्या कचऱ्यांचा प्रश्न मुंबईकरांसमोर उपस्थित झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
Mumbai High Court FDA: 'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget