एक्स्प्लोर
विसर्जनानिमित्त मध्य-पश्चिम-हार्बर रेल्वेवर विशेष लोकल
मुंबई : गणेश विसर्जनानिमित्त आज पश्चिम आणि मध्य रेल्वेवर विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. चर्चगेट-विरार मार्गावर या विशेष लोकलच्या 4 फेऱ्या चालवण्यात येतील, तर कल्याण/ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस या मार्गावर 8 लोकल धावतील.
गणेश विसर्जनानिमित्त पश्चिम रेल्वेवर चालवली जाणारी पहिली विशेष लोकल चर्चगेटवरुन विरारच्या दिशेने डाऊन मार्गावर रात्री 1.15 वाजता सोडण्यात येईल, तर शेवटची विशेष लोकल रात्री 3.20 वाजता सोडण्यात येईल.
विरारवरुन चर्चगेटच्या दिशेने अप मार्गावर पहिली विशेष लोकल 12 वाजून 15 मिनिटांनी सोडण्यात येईल, तर शेवटची विशेष लोकल रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी सोडण्यात येईल.
----------------------------- पश्चिम रेल्वेवरील 15 सप्टेंबर विशेष लोकल वेळापत्रक :
चर्चगेट ते विरार डाऊन पहिली लोकल रात्री 1.15 वाजता दुसरी लोकल रात्री 1.55 वाजता तिसरी लोकल रात्री 2.25 वाजता चौथी लोकल रात्री 3.20 वाजता ----------------------------- विरार ते चर्चगेट अप पहिली लोकल रात्री 12.15 वाजता दुसरी लोकल रात्री 12.45 वाजता तिसरी लोकल रात्री 1.40 वाजता ----------------------------- मध्य रेल्वेवरील 15 सप्टेंबर विशेष लोकल वेळापत्रक : सीएसटी ते कल्याण 1.30 वाजता सीएसटी ते ठाणे 2.30 वाजता कल्याण ते सीएसटी 1 वाजता ठाणे ते सीएसटी 2 वाजता ----------------------------- हार्बर रेल्वेवरील 15 सप्टेंबर विशेष लोकल वेळापत्रक : सीएसटी ते पनवेल 1.30 वाजता सीएसटी ते पनवेल 2.45 वाजता पनवेल ते सीएसटी 1 वाजता पनवेल ते सीएसटी 1.45 वाजताअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
क्राईम
Advertisement