एक्स्प्लोर
घरात घुसून अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार
आईवडिलांना घराबाहेर काढून चाकूचा धाक दाखवत एका अल्पवयीन तरुणीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भिवंडीतील न्यू आझादनगर येथे ही घटना घडली.

भिवंडी : आईवडिलांना घराबाहेर काढून चाकूचा धाक दाखवत एका अल्पवयीन तरुणीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीतील न्यू आझादनगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी सापळा लावून दोघांना शिताफीने अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिघा नराधमांनी संगनमत करून पीडित तरुणीच्या घरात घुसून आईवडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत, त्यांना घराबाहेर काढलं आणि तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर हे तिघेही फरार झाले. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दोघांना अटक केली.
शांतीनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान खान (२४), जावेद शेख (२३) आणि किन्ना अशी आरोपींची नावे आहेत. यापैंकी इम्रान आणि जावेद यांना गुरुवारी ठाण्याच्या जिल्हासत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















