एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी
मुंबईतल्या ४ फाईव्ह स्टार हॉटेल्सना उडवून टाकण्यासंदर्भात मेल मुंबई पोलिसांना मिळाला आहे. या मेलमध्ये 7 कोटींची मागणी करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईतील एका 7 स्टार आणि काही 5 स्टार हॉटेल्सना बॉम्ब ने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी मेलद्वारे दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबाच्या नावाने आल्याची माहिती मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त (क्राईम) दिली आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती डोनल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी मिळालेल्या धमकीमुळे मुंबई पोलिस, सायबर पोलिस तपास करत आहेत.
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादाचे सावट आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. मुंबईच्या मोठ्या हॉटेलाना बॉम्बने उडवण्याची धमकी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबा कडून मेल द्वारे देण्यात आल्याच समोर आलं आहे. या मेलमध्ये 7 कोटींची खंडणी मागितली गेली आहे आणि जर ही मागणी 24 तासाच्या आत पूर्ण केली नाही तर तुमचे हॉटेल बॉम्बने उडवू अशा स्वरूपाचा मजकूर लिहिला आहे.
घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी या सर्व हॉटेलांची तपासणी केली पण त्यांना काहीच सापडले नाही. पोलीस सध्या हा मेल कुठून आला आणि कोणी पाठवला याचा शोध लावत आहेत.
Threat to Five Stars Hotel | मुंबईतील चार फाईव्ह स्टार हॉटेल्स उडवण्याची अतिरेक्यांची धमकी, मुंबई पोलिसांकडून सुरक्षेत वाढ
मुंबईच्या लीला, रमादा, पार्क, सी प्रिन्स आणि मिरारोड येथील क्लब सेव्हन इलेव्हन या चार हॉटेलला मेल द्वारे ही धमकी देण्यात आली आहे. हा क्लब भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा असून हा मेल आल्यानंतर पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले आणि त्यांनी सर्व पाहणी केली. पण त्यांना काही संशयास्पद आढळले नाही.
काय लिहल आहे मेल मध्ये.
"हम लष्कर-ए-तय्यबा सेंट्रल ऑफ पाकिस्तान और खलिफा समर्थक ने आपके हॉटेल मे अपने शाहीद को भेजा है. आप हमारी मांगे नही माणेगे तो हर जगह विस्फोट होग. हमे 100 बिटकॉइन (7 करोड रुपये) का भुगतान करे हमारे खाते मे जमा कराए जाते है तो हम ऑपरेशन रोग देंगे..हम अल्लाह के नाम पर मरने के लिये तयार है और कोई हमे रोक नही सकता"...
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की , आम्ही या प्रकरणाची चौकशी करत असून या सर्व हॉटेलची बीडीएस पथकाने तपासणी केली. मात्र त्यांना काही सापडलं नाही मात्र हॉटेलच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
Majha Impact | मंत्र्यांच्या बंगल्यांवरील खर्च मर्यादित ठेवा : अजित पवार
मालमत्ता कर वसूलीसाठी पालिकेची दवंडी, पुढच्या आठवड्यापासून जप्तीची कारवाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement