एक्स्प्लोर

हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबईत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे खासदार कुमार केतकरही उपस्थित होते.

मुंबई : माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे खासदार कुमार केतकरही उपस्थित होते. अभय ठिपसे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक खटल्यात अनियमितता दिसत असून आरोपमुक्त करण्यात आलेल्या आरोपींवर फेरविचार करायला हवा, असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांचं नाव चर्चेत आलं होतं. राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज भिवंडी येथील कोर्टात हजेरी लावली. त्यानंतर गोरेगावमध्ये काँग्रेसच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधितही केलं. त्यानंतर राहुल गांधी यांच्या उपस्थितीत अभय ठिपसे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सध्याच्या वातावरणात देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. धर्मनिरपेक्ष पक्षाची ओळख असलेल्या काँग्रेसमधून परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ठिपसे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना सांगितलं. कोण आहेत अभय ठिपसे? अभय ठिपसे हे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत. त्यांनी सलमान खानची हिट अँड रन केस, बेस्ट बेकरी केस, साध्वी प्रज्ञा केस यांसारखी अनेक प्रकरणे न्यायमूर्ती असताना हाताळली आहेत. शिवाय काही दिवसांपूर्वी सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक प्रकरणी अनियमितता दिसत असल्याचा आरोप केला होता. सोहराबुद्दीन शेख चकमक खटल्यात बड्या आरोपींना मुक्त केलं जात असून हे चिंताजनक आहे. याप्रकरणी फेरतपासणीची गरज निर्माण झाली आहे. वरिष्ठ न्यायालयाने आरोपींना मुक्त करण्याचे जे आदेश देण्यात आले ते पुन्हा तपासावे आणि ते योग्य आहेत की नाही याची शहानिशा करावी, असं अभय ठिपसे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
Mumbai High Court FDA: 'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget