आतापर्यंत OBC Reservation ला धक्का म्हणायचे आता धोका आहे म्हणते : पंकजा मुंडे
राजकीय भूमिका बाजूला ठेवून आपल्याला ओबीसी आरक्षणासाठी एकत्र यावं लागेल, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
मुंबई : आतापर्यंत मी ओबीसी आरक्षणाला धक्का म्हणत होते आता मात्र आरक्षणाला धोका आहे असं मी म्हणते. ओबीसी आरक्षणाला बळी देण्याचं काम सुरु आहे, अशा शब्दात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाला सुप्रीम कोर्टाने नाकारल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच राजकीय भूमिका बाजूला ठेवून आपल्याला ओबीसी आरक्षणासाठी एकत्र यावं लागेल, असंही त्यांनी म्हटलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ओबीसी आरक्षण मुद्द्यावर आपली बाजू मांडली.
ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय
देशभरात चर्चेत असलेल्या ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला. ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी रिपोर्टमध्ये नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. जोपर्यंत पुढचे निर्देश देत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार नाही, असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
'अहवाल गांभीर्याने मांडला नाही'
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मला यामध्ये राजकारण करायचं नाही. सरकारने निर्णय घ्यावा, निवडणूक अयोगाशी चर्चा करावी. आणखी दोन महिने प्रशासक बसवता येईल. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत अपवादात्मक विषय म्हणून प्रशासक नेमला पाहिजे. ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाने अहवाल गांभीर्याने मांडला नाही. त्यामुळे मागासवर्गीय आयोगाच्या अहवाल आणि सदस्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणार. अभ्यासपूर्ण हा डेटा मांडायचा होता पण ते मांडला गेला नाही."
तोपर्यंत सर्व निवडणुका पुढे ढकला : पंकजा मुंडे
मी आता सरकारला विनंती करते, जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढच्या सर्व निवडणुका पुढे ढकला. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. बैठका नंतर घ्या, आधी अपवादात्मक प्रकरण म्हणून निवडणुका पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करावेत. एक ठराविक मुदत घेऊन निवडणुका पुढे ढकलाव्यात, असं पंकजा मुंडे