एक्स्प्लोर
पक्ष्याला वाचवताना विजेचा धक्का, अग्निशमन दलाचे जवान राजेंद्र भोजने यांचा मृत्यू
मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात केबलमध्ये अडकलेल्या ससाणा पक्ष्याची सुटका करताना विजेचा धक्का लागून जखमी झालेले राजेंद्र भोजने यांचा मृत्यू झाला. काल रात्री साडेदहा वाजता ऐरोलीच्या नॅशनल बर्न सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात केबलमध्ये ससाणा पक्षी अडकला होता. त्याची सुटका करताना अग्निशम दलाच्या तीन जवानांना विजेचा धक्का लागला. तिघेही गंभीर जखमी झाले. त्यातील जवान राजेंद्र भोजने यांचा ऐरोलीच्या नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर संजय महादेव काळभेरे, दिनेश उत्तमराव सबनकर या दोन जवानांवर उपचार सुरु आहेत.
राजेंद्र भोजने यांच्या कुटुंबीयांनी पार्थिव उचलू देण्यास नकार दिला आहे. राजेंद्र भोजने यांना 'शहीद' दर्जा मिळावा, यासाठी लेखी पत्र देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
दरम्यान, याआधीही अनेकदा अशा प्रकारचे अडकलेले पक्षी काढताना अग्निशमन दलाच्या जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. राजेंद्र भोजने यांच्यासोबत संजय काळभेरे आणि दिनेश सबनकर हे दोन फायरमनही 70 टक्क्यांपर्यंत जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
राजकारण
राजकारण
Advertisement