Mumbai Dharavi News: मुंबईच्या (Mumbai News) शाहूनगर परिसरात (Shahunagar) असलेला कमला नगरच्या झोपडपट्टीमध्ये (Kamala Nagar Slum) पहाटे भीषण आग (Mumbai Fire) लागली होती. या आगीमध्ये 25 पेक्षा जास्त घरं जळून खाक झाली आहेत. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर अग्निशमक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सध्या फायर कुलिंगचं काम सुरू आहे. 


मुंबईतील (Mumbai Fire Update) धारावी (Dharavi) परिसरात असलेल्या कमला नगरच्या झोपडपट्टीमध्ये पहाटे 4 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. तब्बल तीन तास ही आग धुमसतच होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 ते 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. दाटीवाटीचा परिसर आणि अरुंद रस्ते यामुळे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. 


धारावीच्या शाहुनगर परिसरात पहाटे चारच्या सुमारास ही आग लागली. आग एवढी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या 20 ते 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. धारावीतील शाहुनगरमधील कमला नगर म्हणजे, मोठा दाटीवाटीचा भाग. या झोपडपट्टी परिसरात अनेक लहान मोठी घरं अगदी दाटीवाटीनं एकमेकांना खेटून उभी आहेत. याशिवाय या ठिकाणी अनेक लहान दुकानंही आहेत. ज्या परिसरात आग लागली, त्या परिसरात लेदरची अनेक दुकानं आहेत. तसेच, अनेक लहान-मोठे कपड्यांचे कारखानेही आहेत. त्यामुळे आग आणखी वाढत होती. 


धारावीतील आगीमुळे वाहतुकीत बदल 


धारावी कमला नगर येथील आगीमुळे 90 फीट रोड बंद करण्यात आला असून वाहतूक संथ गतीनं रोहिदास मार्गाकडे वळवण्यात आली आहे. टी जंक्शनपासून 60 फीट रोडवर जाण्याऐवजी रहेजा माहीमकडे वाहतूक वळवण्यात आली आहे.




पाहा व्हिडीओ : Mumbai Dharavi Fire : मुंबईतील कमलानगर भागात भीषण आग, 25 ते 30 घरं जळून खाक ABP Majha



आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलासोबत शाहुनगर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. या परिसरात लहान मोठी दुकानं, कारखान्यांसोबतच अनेक घरंही होती. पोलिसांनी तात्काळ नागरिकांना घरातून बाहेर काढून परिसर मोकळा केला. आग इतकी भीषण होती की, आजुबाजूच्या परिसरात धुराचे लोळ पसरले होते. सुदैवानं आगीत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. परंतु, आगीत तब्बल 50 ते 610 दुकानं जळून खाक झाली आहेत. 


धारावी शाहूनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावी कमला नगरची आग आटोक्यात आली आहे. सध्या फायर कूलिंगचं काम सुरू आहे. 50 ते 60 गारमेंटची दुकानं आणि घरं या आगीत जळून खाक झाली आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


मुंबईच्या कमला नगरच्या झोपडपट्टीमध्ये भीषण आग; 25 हून अधिक घरं आगीच्या भक्ष्यस्थानी