मुंबई : वसई- विरारमधून (Vasai- Virar News)  एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  पायाला झाडू लागला म्हणून महिला सफाई कर्मचाऱ्याला एका कुटुंबानं मारहाण केली आहे. याच मारहाणीचाही व्हिडीओ (Viral Video)  समोर आलाय. याप्रकरणानंतर आता पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच या मारहाणीविरोधात आता संतप्त सफाई कर्मचाऱ्यांनी या निषेधार्थ कामबंद आंदोलन करण्यात आलंय.


समोर आलेल्या माहितीनुसार , सफाई कर्मचारी महिला झाडू मारत असताना, पायाला झाडू लागला म्हणून एका कुटुंबाने चक्क महिला सफाई कर्मचा-याला मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली होती. या घटनेनंतर आज वसई विरारमधील सर्व सफाई कर्मचा-यांनी या विरोधात निषेध व्यक्त करत, काम बंद आंदोलन पुकारलं आहे. 


सफाई कर्मचा-यांनी मारहाणीच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन 


सोमवारी सकाळी 7.30  च्या दरम्यान वसईच्या वाघरीपाडा येथे वसई विरार पालिकेची 50 वर्षाची सफाई कर्मचारी महिला देवयानी म्हाञे ही रस्त्याच्या कडेने झाडू मारत होती. रस्त्यावर झाडू मारताना  चुकून माया ओगानीया हिच्या पायाला झाडू लागला. त्याचा राग धरत माया ओगानीयाच्या कुटुंबियांनी तिच्याशी हुज्जत घालून, तिला चक्क मारहाण केली. मोबाईल क्लिप व्हायरल झाल्यावर संतप्त सफाई कर्मचा-यांनी दुपारनंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात अदखलपाञ गुन्हा दाखल केला आहे. यात माणिकपूर पोलीस मारहाण करणा-या महिलांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहेत. माञ आज सकाळपासून वसई - विरारमधील सफाई कर्मचा-यांनी मारहाणीच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन पुकारलं आहे.  


आम्ही यांचा परिसर स्वच्छ ठेवायचा वर मार पण खायचा का? कर्मचारी संतप्त   


झाडू पायाला लागला नाही पण त्रास द्यायचा म्हणून मुद्दाम महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्यानंतर सफाई कर्मचारी म्हात्रेंनी देखील शिवीगाळ केली.  त्यानंतर आईला  घेऊन आला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. नाल्यामध्ये ढकलेले नंतर घरातील इतर महिला आल्या त्यांनीही मारहाण करण्यास सुरुवात केली. आम्ही यांचा परिसर स्वच्छ ठेवायचा आणि आम्ही यांचा मार खायचा का? असा सवाल सफाई कर्मचारी मंगेश शिंदे यांनी केली आहे. 


हे ही वाचा :


Crime News : घरात कुणीही नसताना प्रियकराने महिलेला संपवलं; खोटा बनाव रचत सत्य लपवलं, मात्र पोलिसांनी केली मारेकाऱ्याला अटक