Virar Crime News विरार : विरारमध्ये एका खळबळजनक हत्येची (Crime News) घटना उघडकीस आली आहे. यात एका विवाहित महिलेची साडीने गळा आवळून हत्या केल्याच उघडकीस आली आहे. याप्रकरणी मध्यरात्री विरार पोलिसांनी महिलेच्या प्रियकाराविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. दोघांमधील किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हत्येपर्यंत गेल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास विरार शहर पोलीस करत आहे.


घरात कुणीही नसताना प्रियकरानेच महिलेला संपवलं  


धनश्री आंबडस्कर (वय 32 वर्ष) ही महिला रुपेश आंबडस्कर (वय 37 वर्ष ) तसेच नेत्रा आणि नव्या या दोन लहान मुलींसह विरार पश्चिमेच्या फुलपाडा येथील साईनाथ अपार्टमेंटमध्ये राहत होती. सोमवारी सकाळी तिचा पती रूपेश कामावर गेला होता, तसेच दोन मुली शाळेत गेल्या होत्या. दरम्यान दुपारच्या सुमारास या प्रकरणातील संशयित आरोपी शेखर कदम हा  धनश्रीच्या घरी आला होता. काही कारणास्तव त्या दोघामध्ये भांडण झालं आणि संशयित आरोपीने धनश्रीचा साडीने गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने धनश्रीची तब्येत बिघडल्याचा बनाव  रचून तिला जवळचा रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला तेथे मृत घोषित केलं. 


पोलिसांनी केली मारेकरी प्रियकराला अटक   


एकाऐकी धनश्री आंबडस्कर यांची प्रकृतीत बिघाड झाला आणि त्यानंतर त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही बाब कुठेतरी न पटणारी आणि संशयास्पद वाटल्याने पोलिसांना या बाबत संशय आला. परिणामी पोलिसांनी तपासाचे चक्र अधिक गतिमान करत हा घटणेचा तपास सुरू केला. तपासाअंती या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर संशयित आरोपी शेखरने धनश्रीची हत्या केल्याचे उघड झालं. विरार पोलिसांनी संशयित आरोपी कदम याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन, त्याला अटक केली आहे. मात्र या हत्येचे घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


बायकोला डोक्यात दगड घालून संपवलं


अशीच एक खळबळजनक घटना सोलापूरतून समोर आली आहे. यात अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीचा झोपेतच डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर रात्रीच भीमा नदीकाठी तिच्या मृतदेहाला जाळून टाकले. दक्षिण सोलापूर (Solapur News)  तालुक्यातील तेलगाव येथे ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे.  याप्रकरणी मंद्रूप पोलिस ठाण्यात पतीसह त्याच्या भावा विरोधात हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. भाग्यश्री बसवराज कोळी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती बसवराज अडव्याप्पा कोळी याच्या विरुद्ध खुनाचा तर त्याचा भाऊ गजानन आडव्याप्पा कोळी आणि शिवानंद आडव्याप्पा कोळी यांच्याविरुद्ध गुपचूप मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या