Maharashtra Farmers Protest LIVE UPDATES | भेंडीबाजारातील महिला शेतकरी कशा? , विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची टीका

Farmers Protest LIVE UPDATES Azad Maidan | अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाचं वादळ अखेर काल रात्री मुंबईत पोहोचलं आहे. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज 25 जानेवारीला दुपारी हा मोर्चा राजभवनावर मोर्चा धडकणार आहे.

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 25 Jan 2021 11:33 PM

पार्श्वभूमी

मुंबई : अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाचं वादळ काल रात्री अखेर मुंबईत पोहोचलं आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज, 25 जानेवारीला हा मोर्चा...More

आझाद मैदान येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सकाळपासून येथील हजारो शेतकरी आंदोलनात शामिल झाले होते. आता हे शेतकरी निवांत झाले असून सकाळपासूनचा थकवा घालविण्यासाठी या ठिकाणी भजन, जागरण, गोंधळ गीतं शेतकरी गात आहेत. यात महिला देखील सहभागी झाल्या आहेत. उद्या हे सर्व शेतकरी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करून आपल्या गावाकडे जातील.