Dharmaveer 2: गेल्या काही महिन्यांपासून धर्मवीर-2 चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सूकता होती. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या धर्मवीर-२ ला पसंतीची पोचपावतीही मिळत आहे. या चित्रपटाची सुरुवातीपासून चर्चा असली तरी आता धर्मवीर-2 मध्ये प्रेक्षकांना एक सरप्राईज मिळालंय. या चित्रपटात एका महत्वाच्या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही क्षणभर चमकल्याचं दिसलं.  सनातन हिंदू धर्माचा रंग भगवा असं म्हणत सुरु झालेला ट्रेलरचा थरार सिनेमातच्या शेवटपर्यंत दिसत असल्याची दाद प्रेक्षक देताना दिसतायत.


धर्मवीर 2 च्या केंद्रस्थानी आनंद दिघेंच्या प्रमुख भूमिकेत अभिनेता प्रसाद ओकच्या कामाचं चांगलंच कौतूक होत आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदेची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्याचं दिसतंय.


एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं टाळ्यांचा कडकडाट


धर्मवीर २ च्या दुसऱ्या भागात अभिनेता क्षितिज दाते यांनी एकनाथ शिंदेंची हुबेहुब वठवलेल्या भूमिकेचं कौतूक होताना दिसत असून शिंदेंची चित्रपटातील एन्ट्रीनं प्रेक्षकही क्षणभर चमकतायत. एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं अनेक थेटरमध्ये टाळ्या शिट्ट्याही वाजल्या आहेत.


दिग्दर्शनाचंही होतंय कौतूक


प्रमुख भूमिकेत असणारा अभिनेता प्रसाद ओक याच्या ॲक्टींगचं कौतूक होत असताना दिग्दर्शक प्रविण तरडेच्या तीक्ष्ण आणि नेमक्या दिग्दर्शनशैलीलाही वाहवा मिळत आहे. राजकीय कारस्थान, वैयक्तिक संघर्ष आणि अस्सल मानवता असे घटक एकत्र आणून विणले आहेत. या चित्रपटाया यशाचं हे ही मोठं कारण मानलं जातंय. ते म्हणाले, ''हा चित्रपट पूर्णपणे हिंदुत्वावर आधारित आहे, खरी व्याख्या आणि बाळासाहेब आणि दिघे साहेबांनी हिंदुत्व कसे आचरणात आणले यावर आधारित आहे." महेश लिमये दिग्दर्शित सिनेमॅटोग्राफी, चित्रपटाचे दृश्य कथाकथन वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. लिमये यांनी सुंदरपणे रचलेल्या शॉट्सचा वापर कथनात समृद्धतेचा एक थर जोडतो, मुख्य क्षणांचे भावनिक भार अचूकतेने कॅप्चर करतो. 


प्रदर्शनाच्या प्रिमीयरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उपस्थिती


चित्रपटाच्या शुभारंभाच्या वेळी शिंदे म्हणाले, "काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करून सत्ता मिळविण्यासाठी काही लोकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा कसा बळी दिला ते आम्ही दाखवू." दिघे यांनी अयोध्येतील राममंदिरासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना पहिली चांदीची वीट कशी दिली यावरही त्यांनी प्रकाश टाकला.