एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्वित्झर्लंडच्या कुटुंबाचं मराठीप्रेम ! मराठी शाळेत शिकण्यासाठी गाठली मुंबई
मार्क आणि यान हि दोन्ही मुलं एक पहिलीमध्ये तर दुसरा तिसरीमध्ये मागील दोन महिन्यांपासून शिक्षण घेत आहे. आता त्यांना प्रार्थना, बड्बडगीत सुद्धा मराठीत गाता येत आहेत.
मुंबई : आपल्या मराठी समाजाचाच मराठी भाषेकडे, महाराष्ट्राच्या मातृभाषेतल्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मराठीची गळचेपी करणारा आहे. असे असताना एक परदेशी जोडपे आपल्या दोन्ही मुलांना तीन-चार महिन्यांसाठी मुंबईतल्याच एका मराठमोळ्या शाळेत घालते. त्यामागे आपल्या मुलांना मराठीतून शिकता आले पाहिजे, मराठी बोलता आली पाहिजे हा एकमेव हेतू असतो. हे सगळं नवल वाटावं असंच आहे.
मूळ मुंबईचे असलेले अमोल आखवे हे कामाच्या निमित्याने काही वर्षांपूर्वी स्वित्झर्लंडला गेले आणि तिथे स्वित्झर्लंडची नागरिक असलेल्या कोरिना शार्कप्लाटज यांच्याशी विवाह करुन तिथेच स्थायिक झाले. मार्क आणि यान ही दोन मुलं दाम्पत्यला झाली. यांची मातृभाषा स्वित्झर्लंडमध्ये राहत असल्याने जर्मन असली तरी ते वडिलांच्या आग्रहामुळे आणि वडील घरी मराठीतचं संवाद साधत असल्याने आता उत्तम मराठीत बोलतात. या मुलांच्या आईला मराठी येत नसलं तरी मराठी बद्दलचं पतीचं आणि मुलांच प्रेम पाहून कोरिना यांनी आपलं काही दिवस मुंबईत जाऊन मराठी शाळेत या मुलांना शिक्षण द्यायचं ठरवलं. त्यानुसार, मागील 2 ते 3 महिन्यापासून हे कुटूंब मुंबईत राहत असून दहिसरच्या शैलेंद्र हायस्कुलमध्ये हे मुलं मराठी शाळेत शिकत होती.
VIDEO | महाराष्ट्रातील सर्व शाळांत मराठी बंधनकारक : मुख्यमंत्री | ABP Majha
अमोल आणि कोरिना यांनी 3 महिने आपल्या गलेलठ्ठ पगार असलेल्या नोकरीतून विश्रांती घेऊन या आपल्या मुलांना मातृभाषेसोबत मूळ वडिलांची असलेली पितृभाषासुद्धा शिकता यावी यासाठी त्यांनी या मुलांना मराठी शाळेत प्रवेश देण्याचा विचार केला. मराठी भाषा, मराठी संस्कृती हि जपली जावी हे शब्द त्यातला ओलावा जपला जावा यासाठी मराठमोळंपण नेमकं काय असतं हे या मुलांना या शाळेतून समजावं हा त्या मागचा उद्देश होता.
त्यामुळे मार्क आणि यान हि दोन्ही मुलं एक पहिलीमध्ये तर दुसरा तिसरीमध्ये मागील दोन महिन्यांपासून शिक्षण घेत आहे. आता त्यांना प्रार्थना, बड्बडगीत सुद्धा मराठीत गाता येत आहेत. त्यांनी शाळेतल्या मराठी मित्राकडून अधिक चांगलं मराठी शिकत आपली जर्मन भाषा त्यांना शिकवत आहे. इंग्रजी शाळेत घालण्यापेक्षा मराठी शाळेत टाकणं खूप महत्वाच वाटलं कारण इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषा अवघड आणि तितकीच समृद्ध असल्याचा कोरिना यांनी म्हणाल्या. आता हे कुटूंब पुन्हा आपल्या देशात काही दिवसांनी जाईल पण एक नवा अनुभव आणि मराठीचा गोडवा घेऊन पुन्हा एकदा या शाळेत येतील असं अमोल आखवे यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
क्रिकेट
Advertisement