एक्स्प्लोर

मॉलमधील एस्केलेटरमध्ये अडकून चिमुकल्याची तीन बोटं तुटली, मुलुंडमधील प्रकार

आपल्या लहान मुलांसह जर तुम्ही एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी गेला असाल तर आपल्या लहान मुलांकडे लक्ष द्या. कारण मुलुंडमधील एका मॉलमध्ये एस्केलेटरमध्ये अडकून एका दीड वर्षीय चिमुकल्याला त्याच्या हाताची तीन बोट गमवावी लागली आहेत.

मुंबई : रेल्वे स्थानक असो किंवा एखादा मॉल प्रत्येक ठिकाणी आता जिन्याची जागा एस्केलेटर म्हणजेच सरकत्या जिन्यांनी घेतली आहे. या सरकत्या जिन्यावर पाय ठेवतात काही मिनिटांमध्ये आपण कुठलेही कष्ट न घेता आपण ये जा करू शकतो. परंतु हे सरकते जिने कधीकधी जीव घेणे देखील ठरू शकतात. मुलुंडच्या आर मॉल मध्ये अशीच एक घटना घडली आहे. दीड वर्षाचा चिन्मय राजीवडे या चिमुकल्याला आपल्या हाताची तीन बोटं गमवावी लागली आहेत. चिन्मय राजीवडे आपल्या आई-वडिलांसह आर मॉलमध्ये खरेदीसाठी आला होता. खरेदी झाल्यानंतर हे तिघे देखील पहिल्या माळ्यावरून सरकत्या जिन्याच्या साहाय्याने खाली उतरले. परंतु आईवडिलांच्या नकळत चिन्मय पुन्हा या सरकत्या जिन्याकडे वळला आणि त्याने हा सरकता जिना चढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात चिन्मय खाली कोसळला आणि सरत्या जिनाच्या पॅसेजमध्ये त्याची तीन बोट अडकली गेली. यावेळी चिन्मय जोरात ओरडला. त्याच्या आई-वडिलांचा लक्ष त्यांच्याकडे गेलं परंतु आई-वडील त्याच्याकडे पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. चिन्मयची तीनही बोटं एस्केलेटरमध्ये अडकून हातावेगळी झाली होती. यानंतर चिन्मयला त्याच्या पालकांनी फोर्टिस रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पुढील उपचारांसाठी केईएम रुग्णालयात दाखल केलं. परंतु चिन्मयच्या हातांच्या नसा दबल्या गेलेल्या असल्यामुळे ही तीनही बोटं पुन्हा डॉक्टरांना जोडता आली नाहीत. सरकते जिने आता कायद्याच्या चौकटीत, विधेयक विधानसभेत मंजूर या प्रकरणांमध्ये पालकांचा निष्काळजीपणा जितका कारणीभूत आहे तितकाच कारणीभूत आहे मॉल प्रशासनाचा हलगर्जीपणा देखील असल्याचे बोलले जात आहे. आता आर मॉलमधील या जिन्याचं मेंटनन्सचं काम सुरू करण्यात आलं आहे. तज्ञांच्या मते सरकत्या जिन्याना देखील सेन्सर्स असतात. या सेन्सर्समुळे एखादा अडथळा आलाच तर हे सरकते जिने लगेच बंद होतात. सोबतच अशा सरकत्या जिन्यांच्या जवळ एक अटेंडंट असणं देखील तितकंच गरजेचं असतं. यासंदर्भात प्रशासनाकडून नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. परंतु बऱ्याच मॉलमध्ये या सरकत्या जिन्याचा मेंटेनन्स केला जात नाही. सोबतच सरकत्या जिन्यांच्या जवळ अटेंडंट देखील नसतो. त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना होतात असं तज्ञांचे मत आहे. दरम्यान यासंदर्भात अद्यापपर्यंत मुलुंड पोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. परंतु या घटनेमुळे हे सरकते जिने किती जीवघेणे ठरू शकतात आणि पालकांनी अशा ठिकाणी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवणं किती गरजेचा आहे हे स्पष्ट होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Video: जय पवार धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करतील का? महिला सन्मानाचा मुद्दा सांगत म्हणत करुणा शर्मांचा सवाल
Video: जय पवार धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करतील का? महिला सन्मानाचा मुद्दा सांगत म्हणत करुणा शर्मांचा सवाल
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Embed widget