एक्स्प्लोर

महावितरणला 20 हजार कोटी रुपयांची गरज असल्याने वीजबिलांचा घोटाळा : किरीट सोमय्या

महावितरण चालवण्यासाठी 20 हजार कोटी रुपयांची गरज होती. त्यामुळे वीजबिलांचा घोटाळा करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

मुंबई : महावितरण चालवण्यासाठी राज्याला 20 हजार कोटी रुपयांची गरज होती. ते उभे करण्यासाठी मंत्रालयात एक कट शिजला आणि राज्यातील वीज ग्राहकाला त्यांनी वाढीव बिलं पाठवली, असा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महावितरणचा काला चिठ्ठा या मोहिमेची सुरुवातही करण्यात आली. या वेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, आम्ही राज्यातील 20 ठिकाणांहुन प्रातिनिधिक स्वरूपात 100 बिले एक नमूना म्हणून आणली आहेत. या वीजबिलांचा आम्ही बारीक अभ्यासही केलाय. लॉकडाऊनमध्ये वीजदर कमी करायला पाहिजे. मात्र, त्यांनी 20 टाके वाढवले आहे. राज्य सरकार लोकांची दिशाभूल करुन लूट करत आहेत. हे सरकार लोकांना मूर्ख बनवत आहे. सरासरी बिलं द्यायची हा या सरकारचा घोषित केलेला निर्णय होता. मात्र, प्रत्येक्षात वेगळेच आहे. 3 ते 10 पट बिलं काढली आहेत. हे हप्ते खाऊ सरकार लोकांना हप्त्याने बिल भरा म्हणते, असं किरीट सोमय्या म्हणाले. एकनाथ खडसेंना वाढीव वीजबिलाचा 'शॉक', बिलात सूट देण्याची मागणी महावितरण चालवायला सरकारकडे पैसे नाहीत : सोमय्या महावितरणकडे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत, वीज खरेदी करायला पैसे नाहीत. त्यामुळे त्यांनी असं कारस्थान रचले. राज्यात 1 लाख ग्राहकांना अशी बिले पाठवलीत. जिथं बिल दुप्पट पेक्षा जास्त आहेत. अश्या 40 हजार तक्रारी आल्या आहेत. आम्ही हजारो बिले जमा केली आहेत. ही बिलं राज्यपाल यांना पाठवणार आहे. महावितरण सोबत बेस्ट, अदानी, टाटा यांनी पण जर वाढीव बिल पाठवली असतील तर त्यांनाही जाब विचारणार असल्याचे सोमय्या म्हणाले. महावितरणने अशी बिलं का पाठवली? असा प्रश्न करत जुलै मधील बिलं मागे घेण्याची मागणी केलीय. मात्र, ही बिलं मागे घेण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारचा नाही. राज्य सरकारने परत जुलै महिन्यात आलेली बिले मागे घ्यावीत, अशी मागणी आम्ही केली असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. या वेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, महावितरणच्या बिलांचा हा घोटाळा आहे. गेल्या 8 महिन्यात 'जमलं तर ढकलून पाहू' असे सरकार आहे. अनेक गोष्टी सरकार जमल्या तर करते, नाही तर ढकलते. Eknath Khadse | एकनाथ खडसेंनाही महावितरणचा शॉक, लाखभर बिल आल्याने खडसेंचा संताप

महत्त्वाच्या बातम्या

Orchestra Bar Bill : ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मातोश्रीवर आमदारांची  बैठक सुरु, बैठकीला कोणकोणते आमदार उपस्थित?
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मातोश्रीवर आमदारांची  बैठक सुरु, बैठकीला कोणकोणते आमदार उपस्थित?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश

Embed widget