(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kiran Pawaskar : मंत्र्यांचे राजीनामे मागाल तर आदित्य ठाकरेंचे दारू पार्ट्यांचे व्हिडीओ दाखवू; किरण पावरस्कर यांचा इशारा
Aditya Thackeray : शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई: राज्यातील मंत्र्याचे राजीनामे मागाल तर आदित्य ठाकरे यांचे पार्ट्यामधल्या दारू पितानाचे व्हिडीओ दाखवू असा इशारा शिंदे गटाच्या किरण पावसकर यांनी दिला आहे. शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा दारुबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली होती. त्याला उत्तर देताना किरण पावस्कर यांनी हे वक्तव्य केलं.
किरण पावसकर म्हणाले की, "ज्यांना नाईट लाईफचं आकर्षण आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचं नाटक बंद करावं. त्यातून हे मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे राजीनामे मागत आहेत. मंत्र्यांचे राजीनामे मागाल तर सगळ्या व्हिडीओसह तुम्हाला एक्स्पोज करु. अब्दुल सत्तारांचा दारूच्या वक्तव्यावरुन यांनी राजीनामा मागवला. आदित्य ठाकरे मिटिंग सुरू असताना दारुचे व्हिडीओ आहे, त्यांच्या पार्ट्यांचे व्हिडीओ आहेत. तुम्हाला किती व्हिडीओ बघायचे आहेत?"
काय आहे प्रकरण?
गेल्या आठवड्यात कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे पीक नुकसान पाहणीच्या बीड दौऱ्यावर आले होते. यावेळी बीडमधील रेस्ट हाऊसमध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत कार्यकर्ते चहा घेत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी चहा नको म्हटले. त्यावर अब्दुल सत्तार यांनी तुम्ही दारू पिता का? असं विचारलं.
अब्दुल सत्तारांचा हाच व्हिडिओ काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट केला. अब्दुल सत्तार यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती.
अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा?
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 27, 2022
गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराब
किसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराब
एक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करो
हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो 🤔 pic.twitter.com/UDZsfypmAO