एक्स्प्लोर

Eknath Khadse ED Summon | एकनाथ खडसे 14 दिवसांनी ईडीसमोर हजर होणार!

Eknath Khadse ED Summon : कोरोनाची लक्षणे असल्याने आज एकनाथ खडसे आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार नाहीत. आता 14 दिवसांनंतर त्यांची चौकशी होणार आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आज चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात हजर राहणार नाही. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने विश्रांती घेणार असून त्यानंतर चौकशीसाठी हजर होण्यासाठी ईडीकडून संमती मिळाली आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनीच पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, ईडी चौकशीच्या निमित्ताने एकनाथ खडसे कालच मुंबईत दाखल झाले आहेत.

भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यानंतर आज 30 डिसेंबरला त्यांचा ईडी कार्यालयात हजर राहायचं होतं. परंतु मागील दोन दिवसांपासून खडसे यांचा ताप, सर्दी आणि खोकला जाणवत आहे. कोरोनाची लक्षणे असल्याने चाचणी केली असून अहवाल प्रतीक्षेत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी 14 दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. याबाबत ईडीला कळवलं असून त्यांनी 14 दिवसांनी चौकशीसाठी हजर राहण्याची परवानगी दिली आहे, असं खडसे यांनी सांगितलं.

प्रकृती बरी झाल्यावर ईडीला पूर्ण सहकार्य करणार : एकनाथ खडसे

एकनाथ खडसे यांनी जारी केलेल्या पत्रकात लिहिलं आहे की, "दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी मुंबई येथील कार्यालयात उपस्थित होण्याबाबत सक्त वसुली संचालनालय (ईडी) कडून समन्स प्राप्त झाले होते. ईडी कार्यालयाकडे खुलासा सादर करण्यासाठी दिनांक 30 डिसेंबर रोजी हजर होणार होतोच. मात्र मध्यंतरी 28 डिसेंबर रोजी ताप, सर्दी, कोरडा खोकल्याचा त्रास सौम्य प्रमाणा त जाणवला. वैद्यकीय तपासणीअंती कोरोना सदृश्य लक्षणे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाची चाचणी घेतली.  निष्कर्ष अद्याप प्रलंबित आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्लानुसार 14 दिवस विश्रांती आवश्यक आहे. तसे ईडी कार्यालयास कळवले आहे. त्यांनी 14 दिवसांनंतर हजर होण्याबाबत संमती दिलेली आहे. माझी प्रकृती बरी झाल्यावर सक्त वसुली संचालयास (ईडी) पूर्ण सहकार्य करणार आहे. धन्यवाद"

Eknath Khadse ED Summon | एकनाथ खडसे 14 दिवसांनी ईडीसमोर हजर होणार!

भोसरी भूखंड प्रकरणी ही नोटीस आहे. याआधीही चार वेळा चौकशी झाली आहे, ही पाचवी आहे. त्यांना जे सहकार्य लागले ते मी केले आहेत. आता देखील सहकार्य करेन. मी यापेक्षा जास्त बोलू इच्छित नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले ईडीच्या नोटीसबाबत म्हणाले होते.

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करुन ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील खडसेंच्या काही सर्मथकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्ष सोडताना त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन असंही खडसे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे एक ना एक दिवस आपल्याला ईडीची नोटीस मिळेल, असंही ते म्हणाले होते.

'खडसेंना दिलेल्या ईडीच्या नोटीसीची भीती नाही' दरम्यान, खडसेंना आलेल्या ईडीच्या नोटिसीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. राजकीय नेता जर भाजपच्या विरोधात जातो त्यांच्यामागे ईडी लावण्याचं काम भाजप करत आहे. देश हिताच्या निर्णयपेक्षा सूड भावनेच्या प्रवृत्तीने राजकीय नेत्यांच्या मागे लागले जाते. मात्र खडसे यांना पाठवलेल्या नोटीसीची आम्हाला कुठलीही भीती वाटत नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. संबंधित बातम्या

भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसेंना EDची नोटीस, आज खडसे चौकशीसाठी जाणार का? 

ईडीची नोटीस मिळाल्याची एकनाथ खडसेंची कबुली, 30 डिसेंबरला हजर राहण्याची समन्स

भाजपच्या विरोधात जातील त्यांच्यामागे 'ईडी' लावली जाते - जयंत पाटील

महत्त्वाच्या बातम्या

गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget