एक्स्प्लोर

भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसेंना EDची नोटीस, आज खडसे चौकशीसाठी जाणार का?

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर त्यांना आज 30 डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहावं लागणार आहे. मात्र खडसे स्वतः हजर राहतात की वकीलामार्फत आपली बाजू मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर त्यांना आज 30 डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहावं लागणार आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ खडसे हे त्यांच्या वकीलामार्फत हजर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खडसे हे उद्या स्वतः हजर राहतात की वकीलामार्फत आपली बाजू मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. या संदर्भात खडसे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकलेला नाही. दरम्यान, ईडी चौकशीच्या निमित्ताने खडसे हे कालपासूनच मुंबईत दाखल झाल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी ईडीची नोटीस मिळाल्याचं सांगितलं होतं. 30 डिसेंबरला हजर राहण्याचा ईडीची समन्स मला मिळाली आहे, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं होतं. या आधीही माझ्या या घटनेची चौकशी झाली आहे. त्यांना जे सहकार्य लागले ते मी पुरवले आहे. आता देखील सहकार्य करेल, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं.

भोसरी भूखंड प्रकरणी ही नोटीस आहे. याआधीही चार वेळा चौकशी झाली आहे, ही पाचवी आहे. मी यापेक्षा जास्त बोलू इच्छित नाही. आज मला काहीही सांगायचं नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले होते.

ईडीची नोटीस मिळाल्याची एकनाथ खडसेंची कबुली, 30 डिसेंबरला हजर राहण्याची समन्स

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करुन ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील खडसेंच्या काही सर्मथकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्ष सोडताना त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन असंही खडसे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे एक ना एक दिवस आपल्याला ईडीची नोटीस मिळेल, असंही ते म्हणाले होते.

खडसे यांनी जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी बँकेतील घोटाळा उघडकीस आणण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. यामध्ये भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा होती.

भाजपच्या विरोधात जातील त्यांच्यामागे 'ईडी' लावली जाते - जयंत पाटील

'खडसेंना दिलेल्या ईडीच्या नोटीसीची भीती नाही'

दरम्यान, खडसेंना आलेल्या ईडीच्या नोटिसीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. राजकीय नेता जर भाजपच्या विरोधात जातो त्यांच्यामागे ईडी लावण्याचं काम भाजप करत आहे. देश हिताच्या निर्णयपेक्षा सूड भावनेच्या प्रवृत्तीने राजकीय नेत्यांच्या मागे लागले जाते. मात्र खडसे यांना पाठवलेल्या नोटीसीची आम्हाला कुठलीही भीती वाटत नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Dharashiv: तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...
तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; धाराशिवाच्या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...
Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad YCM Hospital: मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर थांबवलं; शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, मद्याचे पेग, चकना अन् जेवणाची ताट, वायसीएममधील धक्कादायक व्हिडीओ समोर
मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर थांबवलं; शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, मद्याचे पेग, चकना अन् जेवणाची ताट, वायसीएममधील धक्कादायक व्हिडीओ समोर
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Salman Khan Share Photos With Salim Khan: 'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Thane Crime Pradeep Purnekar Case: राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Embed widget