एक्स्प्लोर
Advertisement
वाहनं पिवळ्या रेषेच्या बाहेर असल्यानंतर टोल आकारु नये : शिंदे
सध्या नाताळ आणि वीकेंडमुळं मुंबईतल्या सगळ्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी पाहायला मिळते आहे. त्यातच टोलनाक्यावर अनेक वाहनं अडकून पडली आहेत.
मुंबई : वाहनं पिवळ्या रेषेच्या बाहेर असल्यानंतरही टोलनाक्यांवर टोल घेतला जात असेल, तर त्यांच्यावर कारवाई करु, अशी माहिती एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
मुलुंडमध्ये वाहनं पिवळ्या रेषेच्या बाहेर होती. मात्र तरीही याठिकाणी सर्रासपणे टोलवसुली सुरु असल्याचं वृत्त एबीपी माझानं दाखवलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.
पिवळ्या रेषेच्या पुढे टोल आकारु नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा एकनाथ शिंदेंननी दिला आहे.
सध्या नाताळ आणि वीकेंडमुळं मुंबईतल्या सगळ्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी पाहायला मिळते आहे. त्यातच टोलनाक्यावर अनेक वाहनं अडकून पडली आहेत. पिवळ्या रेषेच्या पुढं टोल वसुली करु नयेस असे आदेश असतानाही एमईपीचे अधिकारी बिनदिक्कतपणे टोलवसुली करत आहेत.
पिवळ्या रेषेबाबत कोणताही शासन आदेश नसल्याचे एमईपीच्या अधिकारी सांगत आहेत. या शिवाय सध्या वाहतूक कोंडीमुळे ठाणेमार्गे अनेक वाहनं नवी मुंबईच्या दिशेनं येत आहेत. त्यामुळे त्यांना ठाणे आणि ऐरोली अशा दोन ठिकाणी टोल द्यावा लागतो आहे.
VIDEO : वाहनं पिवळ्या रेषेच्या बाहेर असल्यानंतर टोल आकारु नये : एकनाथ शिंदे
संबंधित बातमी - ठाणे-बेलापूर रस्त्यावर दुरुस्तीमुळे कोंडी, लाँग वीकेंडमुळे ट्राफिक जाम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
भारत
Advertisement